नीरज कौशल यांचा कॉलम:कचरा व्यवस्थापनाचे धडे मुलांना‎ शाळेपासूनच द्यावे लागतील‎

‎‎‎‎‎‎‎‎दिल्ली तीन टेकड्यांनी वेढलेली आहे. या काही‎सामान्य टेकड्या नाहीत. एकेकाळी कचरा टाकण्यासाठी‎वापरल्या जाणाऱ्या या भूभराव जागा होत्या. आता‎कचऱ्याचे हे डोंगर दरवर्षी उंचच उंच होत चालले‎आहेत. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी हे आरोग्याचे‎गंभीर धोके आहेत. गाझीपूरचा कचरा डेपो तर‎जवळपास कुतुबमिनारइतका उंच झाला असून 70 एकर‎परिसरात पसरलेल्या कचऱ्याच्या क्षेत्रावर स्थित आहे.‎भलसावा आणि ओखला येथील कचरा डेपोही‎गाझीपूरप्रमाणेच काठोकाठ भरलेले आहेत, विषारी वायू‎उत्सर्जित करतात आणि किमान 500 मीटर परिघातील‎भूजल प्रदूषित झाले आहे.‎ कचरा ही एक जागतिक समस्या आहे. दरडोई कचरा ‎‎उत्पादन हे आर्थिक वाढीचे एक सशक्त मोजमाप आहे, हे ‎‎जाणून वाचकांना आश्चर्य वाटेल. हे ग्राहकांची‎खरेदी-शक्ती आणि औद्योगिक क्रियाकलापांचे प्रतिनिधी ‎‎निदर्शक आहे. काही शहरे आणि देश इतरांच्या तुलनेत ‎‎कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करतात.‎पुनर्वापर आणि पॅकेजिंगच्या आपल्या संस्कृतीमुळे‎भारतात दरडोई कचरा उत्पादन अनेक देशांच्या तुलनेत‎कमी आहे. तरीही, दिल्लीच्या कचरा-डोंगरांवरून हे‎स्पष्ट होते की, जर प्रभावी व्यवस्थापन नसेल तर कचरा‎विषारी ढिगाऱ्यात बदलू शकतो. ज्याप्रमाणे कचरा निर्मिती‎हे आर्थिक वाढीचे माप आहे, त्याचप्रमाणे कचऱ्याचे‎प्रभावी व्यवस्थापन हे विकासाचे माप आहे. हे मी‎अलीकडेच जपानच्या माझ्या प्रवासादरम्यान शिकले.‎जपानमध्ये कदाचित जगातील सर्वात व्यापक कचरा‎संकलन प्रणाली आहे. तिथला समाज विविध प्रकारचे‎पुनर्वापर करण्यायोग्य पदार्थ आणि विघटनशील व‎अविघटनशील कचरा वेगळा करण्याबाबत पूर्णपणे‎शिक्षित आहे. टोकियोमधील एका उपहारात मी स्क्रीनच्या‎माध्यमातून ऑर्डर दिली आणि जेवण तयार झाल्यावर ते‎घेतले. या संपूर्ण प्रक्रियेत माणसांशी खूप कमी संपर्क‎आला. परंतु ट्रेची विल्हेवाट लावताना एक कर्मचारी तिथे‎उपस्थित होता, ज्याने ट्रे घेऊन कचरा योग्य डब्यांमध्ये‎टाकला. टोकियोमधील अनेक उपाहारागृहांमध्ये हीच‎व्यवस्था पाहायला मिळाली. शहरात कचरा संकलनाचे‎निकष इतके कडक आहेत की, ग्राहकांवर कचऱ्याच्या‎विल्हेवाटीची जबाबदारी सोडली जाऊ शकत नाही.‎ टोकियोमध्ये मी अनेक गल्ल्यांपर्यंत एक कागदी ग्लास‎फेकण्यासाठी कचराकुंडी शोधत राहिले, पण यशस्वी‎झाले नाही. एका परिसंवादात मी विद्यार्थ्यांच्या एका‎गटाला विचारले : तुम्ही तुमच्या कचऱ्याचे काय करता?‎एकाने उत्तर दिले, आम्हाला लहानपणापासून शिकवले‎गेले आहे की कचरा घरी घेऊन जा, बाहेर सोडू नका.‎दुसऱ्याने सांगितले, आमच्यापैकी बहुतेक जण अशा‎वस्तू विकत घेत नाहीत, ज्यामुळे कचरा निर्माण होईल‎आणि आम्ही कचरा ठेवण्यासाठी एक छोटी पिशवी‎सोबत ठेवतो. भारतात कचरा विल्हेवाटीचे निकष‎वेगळे आहेत. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडी‎शोधणे कठीण असायचे; आपल्याला जिथे वाटेल तिथे‎आपण कचरा फेकून द्यायचो. आता किमान विमानतळ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आणि रुग्णालयांमध्ये कचराकुंड्या मिळतात, पण आपण‎त्या रिकाम्या करायला विसरतो.‎ बिहारमधील पूर्णिया येथे एका भेटीदरम्यान माझ्या पदरी‎निराशा आली, जेव्हा एका वाटसरूने मला सांगितले की‎बिहारमध्ये कचराकुंड्या नाहीत. रस्त्याच्या कडेला कचरा‎टाकणे इथे स्वीकार्य आहे. जेव्हा माझ्या सहकाऱ्याने‎शालेय मुलांना सांगितले की चॉकलेटचे वेष्टन‎कचराकुंडीत टाकावे, तेव्हा मुलांनी तेच सांगितले की,‎आमच्याकडे कचराकुंड्या नाहीत. आपण सार्वजनिक‎स्वच्छतेबाबत आपला दृष्टिकोन बदलल्याशिवाय स्वच्छ‎राष्ट्र बनू शकत नाही. जर आपल्याला कचऱ्याचे डोंगर‎सपाट करायचे असतील, तर आपल्याला शाळेपासूनच‎मुलांना कचरा विल्हेवाटीचे धडे शिकवावे लागतील.‎ (हे ‎लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)‎ सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबत‎आपला दृष्टिकोन बदलल्या‎ शिवाय‎आपण स्वच्छ राष्ट्र बनू शकत नाही.‎कचऱ्याचे डोंगर सपाट करायचे असतील,‎तर आपल्याला शाळेपासूनच मुलांना धडे‎शिकवावे लागतील‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *