तरुणांच्या आंदोलनांनी देशातील शिक्षण व्यवस्थेचीस्थिती बदलण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला आहे.20 जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्यालाठीहल्लाप्रकरणी राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिकाघेतली आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्नकरत आहे. त्यामुळे 2027 च्या सुरुवातीला होणाऱ्याविधानसभा निवडणुकांच्या तयारीकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे. भाजपवरही आपले राजकीय वर्चस्व पुन्हाप्रस्थापित करण्याचा दबाव वाढला आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीचे पहिले पाऊल म्हणूनभाजपने नुकतेच आपल्या संघटनेत फेरबदल केले आहेत.भाजप अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आठ महिन्यांनीनितीन नवीन यांनी अखेर आपली नवीन टीम जाहीरकेली. यात काही धक्कादायक नावे समोर आली. स्मृतीइराणी आणि राम माधव यांचे पुनरागमन झाले. पण हेबदल फारसे नाट्यमय नव्हते. नव्या आव्हानांनुसारपक्षाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे.भाजपच्या अंतर्गत रचनेत व संघ परिवारासोबतच्यासंबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो. अनुभव वबदल यांना एकत्र आणत पक्षातील विविध गटांनाजोडण्याचे प्रयत्नही यात स्पष्ट दिसतात. 1990 च्यादशकात लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपमध्ये तरुणनेतृत्वाला घडवण्याचे काम सुरू केले होते. त्यांनी सुषमास्वराज, प्रमोद महाजन, गोविंदाचार्य, व्यंकय्या नायडू वउमा भारती यांसारख्या तरुण नेत्यांना पुढे आणले.अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेत हीचमंडळी त्यांची मुख्य टीम होती. गुजरातवरून ही यात्रा सुरूकरण्यात नरेंद्र मोदी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावलीहोती. पुढे अरुण जेटली समोर आले. कर्नाटकातून अनंतकुमार यांचा उदय झाला. मागे वळून पाहिल्यासभाजपमध्ये नवे नेतृत्व तयार करणे हे अडवाणी यांचे सर्वात मोठे योगदान मानले जात होते. संघटनेतील बदलानंतरआता लोक संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाची वाट पाहत आहेत. 12 वर्षांच्या सत्तेनंतर कथित असंतोषाचा सामना करण्यासाठी पक्ष काय करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.पक्ष यासाठी एखादा मोठा निर्णय घेणार, की संथ गतीनेबदल करण्याचा मार्ग निवडणार? वास्तविक, चार महत्त्वाच्या कारणांमुळे पक्ष संघटनेत फेरबदल करणे अनिवार्य झाले होते. पहिले कारण म्हणजे ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’ चे आव्हान. जंतर-मंतरव झारखंडसह देशाच्या विविध भागात शाळकरी मुलांनी केलेल्या आंदोलनांवरून हे आव्हान स्पष्ट झाले आहे.तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पारंपरिक राजकीय पक्षांपेक्षा वेगळे असलेले हे तरुण सरकारच्या कोणत्याही अटींवर तडजोड करण्यास तयार नाहीत. भूतकाळातविरोधी पक्ष मुद्दे उपस्थित करत असत, आपली बाजूमांडत असत आणि राजकीय फायदा घेत असत. नंतरकाही मागण्या मान्य झाल्यावर सरकारसोबत तडजोडकरत असत. पण ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. भाजप त्यांच्याशीसंवाद वाढवू इच्छितो. याचा मार्ग सोशल मीडिया त्यातही ‘इन्स्टाग्राम’द्वारे जातो असे दिसते; त्याकडे पक्षानेआतापर्यंत दुर्लक्ष केले होते. पक्ष ‘एक्स'''' (ट्विटर)आणि ‘फेसबुक''''वर अधिक लक्ष केंद्रित करत होता.भाजपने आपल्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीययांना हटवणे म्हणजे त्यांनी स्वीकारलेली आक्रमक शैलीआता प्रभावी राहिलेली नाही, याची कबुलीच होती.भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका वर्गालाअसेही वाटते की, 20 जुलै रोजी आंदोलनकर्त्यांवरकेलेल्या बलप्रयोगाचा विपरीत परिणाम झाला आहे. दुसरे स्पष्ट कारण म्हणजे 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब,गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोवायेथे होणाऱ्या विधानसभा निवडणुका. नव्या चेहऱ्यांच्याआगमनाने या राज्यांमध्ये पक्षाच्या कामात नवी ऊर्जायेईल, अशी अपेक्षा आहे. आम आदमी पक्ष सोडूनभाजपमध्ये प्रवेश केलेल्या सात राज्यसभा खासदारांपैकीएक असलेल्या संदीप पाठक यांना राष्ट्रीय सचिवकरण्यात आले आहे. सहसा हे पद पक्षात नव्याने आलेल्यालोकांना दिले जात नाही. यावरून भाजप नेतृत्व पंजाबलाकिती महत्त्व देत आहे हे दिसून येते. 2022 मध्ये आमआदमी पक्षाच्या पंजाबमधील निवडणुकीतील विजयातसंदीप पाठक यांनी डेटा डिझायनिंग, बूथ मॅनेजमेंट आणिडिजिटल मीडिया आधारित रणनीती आखण्यातमहत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजप आता या सीमावर्ती राज्यात आपली स्थिती भक्कमकरण्यासाठी आणि सत्ता स्थापनेच्या शर्यतीत स्वतःलामजबूत खेळाडू म्हणून मांडण्यासाठी पाठक यांच्याअनुभवाचा वापर करू इच्छितो. ‘महिला'''' हा घटक2027 च्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्यालोकसभा निवडणुकीत भाजपचा मुख्य मंत्र असणारआहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याचे संकेतदिले होते. महिला आरक्षण विधेयकासोबतच परिसीमन(प्रभाग रचना) विधेयक मंजूर करता यावे, यासाठीभाजप संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्नकरत आहे. स्मृती इराणी यांना सरचिटणीस तर वसुंधराराजे यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. पक्षाच्या 15उपाध्यक्षांपैकी आता 6 महिला आहेत. 65 सदस्यांच्या याटीममध्ये एकूण 12 महिला आहेत, म्हणजेच हे प्रमाण 18टक्क्यांहून अधिक आहे. तिसरा घटक म्हणजेआरएसएस. संघाने नेहमीच भाजपच्या संघटित रचनेलाप्राधान्य दिले आहे. पक्ष संघटना बांधणीत आपली भूमिकाअसावी, अशी संघाची इच्छा असते. बी. एल. संतोषराष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून कायम राहणे हेदर्शवते की पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये संघाचे महत्त्वकायम आहे. फेरबदलामागील चौथे कारण म्हणजे भाजप नेतृत्वपक्षातील अंतर्गत शक्ती-गट आणि संघ परिवार यांच्यातसमतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी बाजूलापडलेल्या राम माधव व स्मृती इराणी यांचे पुनरागमन झाले.भाजपची ही नवीन टीम केवळ अमित शाह यांच्यापसंतीची नाही, असा संदेश यातून दिला जात आहे;त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यामिळाल्या तरीही. नव्या टीममध्ये सुनील बन्सल यांचाहीसमावेश आहे. त्यांनी पूर्वी उत्तर प्रदेश व अलीकडेबंगालमधील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.विनोद तावडे हे देखील महत्त्वाच्या सरचिटणीसांमध्येसामील आहेत. (लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.)
12 वर्षांच्या सत्ताकाळानंतरआता पक्षाची भूमिका काय ?संघटनेतील बदलानंतर आता लोकांचे लक्षमंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. 12वर्षांच्या सत्ताकाळानंतर भाजप वाढत्याअसंतोषाला कसा तोंड देतो, हे पाहणेमहत्त्वाचे ठरेल. पक्ष यासाठी काही कठोरपावले उचलणार की संथ आणिटप्प्याटप्प्याने बदल करण्याचा मार्गनिवडणार, याबद्दल उत्सुकता आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


