नाशिक : नाशिक रोडमधील शिवसेनेचा पाया रचला गेलेल्या देवळाली गावाचा समावेश असलेला हा प्रभाग आहे. मात्र, कालौघात देवळाली गाव या प्रभागात शिवसेनेला आव्हान मिळू लागले आहे. मराठा, तेली, माळी, जैन, दलित, मुस्लिम यासह बारा बलुतेदारांचा प्रभाव असलेल्या या प्रभागात सर्वाना सोबत घेउन सहमतीचे राजकारणाभोवती येथील निवडणूका रंगतात. अनेक दिग्गज प्रस्थापितांना नव्या फळीतील युवा इच्छुकांचे आव्हान आहे.
कधी काळी नाशिक रोडच्या राजकारणाची सूत्र देवळाली गावातून हलत. त्यामुळे सर्वाधिक कार्यकर्त्यांचा राबता असलेल्या देवळाली गावात सुंदरनगर रोकडोबावाडीसह झोपडपट्यांसह समस्यांचे आगार असलेले भाग जोडले गेले.
जुने गावठाण, झोपडपट्यासह तोफखाना मार्गावरील जैन बांधवासह विविध अल्पसंख्याक समूहाच्या सर्वाधिक वस्त्या असलेल्या या प्रभागाची संमिश्र स्वरूपाचे राजकारण ही ओळख आहे. इच्छुकांची वाढती संख्या आणि भाजपचा शिरकाव झाल्याने शिवसेना- भाजपमधील सत्ता संघर्षात इतर पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे या वेळी शिवसेना- भाजप शिवाय मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने कंबर कसली आहे. मुस्लिम, दलित अल्पसंख्याक मतांचे गणित जुळवून सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
वालदेवी, झोपड्या अन् गुन्हेगारी
वालदेवी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आणि रोकडोबावाडीसह सुंदरनगरसह झोपडपट्टीतील मूलभूत नागरिक प्रश्न या भागातील प्रमुख डोकेदुखी आहे. एकेकाळी नाशिक रोडचे केंद्र असलेल्या देवळाली गावात वाढत्या गुन्हेगारीमुळे अनेक व्यावसायिक मतदार जेल रोडसह इतर भागात स्थलांतरित झाले आहे. वालदेवी नदीत तोफखाना केंद्रासह सगळ्या बहुमजली इमारतीचे सांडपाणी सोडलेले असल्याने वालदेवीला नदी म्हणावे का, असा प्रश्न पडावा. चेहेडी बंधाऱ्यात दारणेच्या पाण्यात वालदेवीच्या सांडपाणी मिसळते. ही एक प्रमुख समस्या आहे. गावठाण असूनही शहरातील सगळ्या गावठाणापेक्षा येथील झोपड्यांची दुरवस्था आहे.
हे आहेत इच्छुक
ज्योती खोले, सूर्यकांत लवटे, अस्लम मणियार, सुधाकर जाधव, श्याम गोहाड, प्रकाश कोरडे, आशा निकाळे, उमेश भोई, कामिल इमानदार, किरण राक्षे, कुमार पगारे, गौरव बाफना, चंदू साडे, गौरव विसपुते, गणेश बनकर, चैतन्य देशमुख, नयना वाघ, नितीन खोले, महेंद्र अहिरे, मनिषा संघवी, बाजीराव मते, योगेश गाडेकर, मंगेश लांडगे, रामदास सदाफुले, लक्ष्मण साळवे, विकास गिते, रिझवान सय्यद, शंकरभाई मंडलिक, वसीम शेख, संजय कोचर, सारिका किर, सनी वाघ, सिद्धार्थ गांगुर्डे, सुनील चोपडा, स्नेहल देशमुख, विश्वास कापसे.हे पण वाचा-
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




