नाशिक : बारा बलुतेदारांच्या प्रभागात सहमतीचे राजकारण

नाशिक : नाशिक रोडमधील शिवसेनेचा पाया रचला गेलेल्या देवळाली गावाचा समावेश असलेला हा प्रभाग आहे. मात्र, कालौघात देवळाली गाव या प्रभागात शिवसेनेला आव्हान मिळू लागले आहे. मराठा, तेली, माळी, जैन, दलित, मुस्लिम यासह बारा बलुतेदारांचा प्रभाव असलेल्या या प्रभागात सर्वाना सोबत घेउन सहमतीचे राजकारणाभोवती येथील निवडणूका रंगतात. अनेक दिग्गज प्रस्थापितांना नव्या फळीतील युवा इच्छुकांचे आव्हान आहे. कधी काळी नाशिक रोडच्या राजकारणाची सूत्र देवळाली गावातून हलत. त्यामुळे सर्वाधिक कार्यकर्त्यांचा राबता असलेल्या देवळाली गावात सुंदरनगर रोकडोबावाडीसह झोपडपट्यांसह समस्यांचे आगार असलेले भाग जोडले गेले. जुने गावठाण, झोपडपट्यासह तोफखाना मार्गावरील जैन बांधवासह विविध अल्पसंख्याक समूहाच्या सर्वाधिक वस्त्या असलेल्या या प्रभागाची संमिश्र स्वरूपाचे राजकारण ही ओळख आहे. इच्छुकांची वाढती संख्या आणि भाजपचा शिरकाव झाल्याने शिवसेना- भाजपमधील सत्ता संघर्षात इतर पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे या वेळी शिवसेना- भाजप शिवाय मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने कंबर कसली आहे. मुस्लिम, दलित अल्पसंख्याक मतांचे गणित जुळवून सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वालदेवी, झोपड्या अन्‌ गुन्हेगारी वालदेवी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आणि रोकडोबावाडीसह सुंदरनगरसह झोपडपट्टीतील मूलभूत नागरिक प्रश्न या भागातील प्रमुख डोकेदुखी आहे. एकेकाळी नाशिक रोडचे केंद्र असलेल्या देवळाली गावात वाढत्या गुन्हेगारीमुळे अनेक व्यावसायिक मतदार जेल रोडसह इतर भागात स्थलांतरित झाले आहे. वालदेवी नदीत तोफखाना केंद्रासह सगळ्या बहुमजली इमारतीचे सांडपाणी सोडलेले असल्याने वालदेवीला नदी म्हणावे का, असा प्रश्न पडावा. चेहेडी बंधाऱ्यात दारणेच्या पाण्यात वालदेवीच्या सांडपाणी मिसळते. ही एक प्रमुख समस्या आहे. गावठाण असूनही शहरातील सगळ्या गावठाणापेक्षा येथील झोपड्यांची दुरवस्था आहे. हे आहेत इच्छुक ज्योती खोले, सूर्यकांत लवटे, अस्लम मणियार, सुधाकर जाधव, श्याम गोहाड, प्रकाश कोरडे, आशा निकाळे, उमेश भोई, कामिल इमानदार, किरण राक्षे, कुमार पगारे, गौरव बाफना, चंदू साडे, गौरव विसपुते, गणेश बनकर, चैतन्य देशमुख, नयना वाघ, नितीन खोले, महेंद्र अहिरे, मनिषा संघवी, बाजीराव मते, योगेश गाडेकर, मंगेश लांडगे, रामदास सदाफुले, लक्ष्मण साळवे, विकास गिते, रिझवान सय्यद, शंकरभाई मंडलिक, वसीम शेख, संजय कोचर, सारिका किर, सनी वाघ, सिद्धार्थ गांगुर्डे, सुनील चोपडा, स्नेहल देशमुख, विश्‍वास कापसे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply