अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणी तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच राजपालचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चेक बाऊन्स प्रकरणाबद्दल मोकळेपणे बोलताना दिसतोय. तसंच व्हिडीओमध्ये त्याने चित्रपट बनवण्यासाठी पैसे घेतल्याच्या चर्चांना स्पष्ट नकार दिला आहे. त्याचसोबत त्याच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचंही त्याने म्हटलंय.
‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यादवला विचारलं गेलं की, त्याने चित्रपट बनवण्यासाठी बिझनेसमन माधव गोपाल अग्रवालकडून पाच कोटी रुपये घेतले होते का? त्यावर उत्तर देताना राजपाल म्हणाला, “मी पैसे घेतले नव्हते, कारण त्यांनी फायनान्सर म्हणून स्वत: पैसे गुंतवले होते. त्यांना त्यांच्या नातवाला हिरो बनवायचं होतं. मी ‘अता पता लापता’ या चित्रपटाचा दिग्दर्शक नव्हतो, ना आहे, ना पुढे राहणार. मी अभिनेता आहे. कधी-कधी 100 मॅच खेळायचे असतात, तर क्रिकेटर 95 मॅच खेळतो आणि 5 मॅच कधी कधी फुटबॉल खेळतो. त्यामुळे आमच्यासाठी हा क्रिएटिव्ह प्रयोग होता.”
“गेल्या 10 वर्षांमध्ये मला काय काय नुकसान सहन करावं लागलं आहे. परंतु तुम्ही खूप काही हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु ज्या हास्याला देवाने बनवलंय, ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोणी माझी बदनामी करत असेल किंवा माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने मी विचलित झालो नाही. मी उलट कोर्टाचे आभार मानतो, कारण कोर्ट नसतं तर समोरच्या व्यक्तीने थेट मला फाशीच दिली असती. कोर्टाने मला वाचवलं आहे. कारण कोर्टात कोणतीच व्यक्ती अभिनय करू शकत नाही. कधी कधी असं होतं की एखाद्याकडे पुरावे म्हणून 50 पानं असतात आणि दुसऱ्याकडे फक्त ‘जंग’ या चित्रपटातील एक डायलॉग असतो की, जजसाहेब.. ज्यांच्याकडे पुरावे नसतात, ते निर्दोष नसतात का”, अशा शब्दांत राजपाल व्यक्त झाला.
याविषयी तो पुढे म्हणाला, “या सर्वांना मी इतकंच सांगू इच्छितो की जी प्रतिमा आहे ती खूप वेगळी आहे. मी पुन्हा कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी माझ्या म्हणण्याला महत्त्व दिलं.”
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

