नवी दिल्ली : सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून दोन तास चौकशी

नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दोन तास चौकशी केली़  त्यांना पुन्हा चौकशीसाठह बोलावण्यात येण्याची शक्यता असल्याचे ‘ईडी’तील सूत्रांनी सांगितल़े

 ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले होत़े  मात्र, सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी लांबणीवर गेली़  काँग्रेसच्या जोरदार शक्तिप्रदर्शनात सोनिया गांधी गुरुवारी ‘ईडी’ चौकशीला सामोऱ्या गेल्या़ 

सोनिया या नुकत्याच करोनामुक्त झाल्या असून, त्यांच्या विनंतीनुसार दोन तासांनी चौकशी थांबविण्यात आल्याचा दावा ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी केला़  मात्र, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तो फेटाळला़  आवश्यकता असल्यास रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सोनिया यांनी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना सांगितले होत़े  मात्र, आणखी प्रश्न विचारायचे नसल्याने ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी चौकशी आटोपती घेतली, असे रमेश यांनी म्हटले आह़े

काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, विरोधकांचाही पाठिंबा

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्या ‘ईडी’ ‘ईडी’च्या चौकशीविरोधात काँग्रेसने गुरुवारी दिल्लीसह देशभर शक्तिप्रदर्शन केल़े  राहुल गांधींच्या ‘ईडी’ चौकशीवेळी विरोधकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला नव्हता, ते पूर्णत: अलिप्त राहिले होते. सोनिया गांधी यांची चौकशी सुरू झाल्यानंतर मात्र विरोधकांनी सोनियांना पाठिंबा देत भाजपवर टीका केली. तपास यंत्रणांच्या गैरवापराद्वारे राजकीय विरोधक आणि टीकाकारांविरुद्ध सूडाची मोहीम सुरू आहे, अशी टीका विरोधकांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply