नवी दिल्ली : भेलवा स्थानकाजवळ रेल्वेच्या इंजिननं घेतला पेट; प्रवासी सुरक्षित

नवी दिल्ली : बिहारमधील भेलवा रेल्वे स्थानकाजवळ डीएमयू रेल्वेच्या इंजिनमध्ये आज (रविवार) आग लागली. ही रेल्वे रक्सौलहून नरकटियागंजला जात होती. पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या रेल्वेचा लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे.

ही रेल्वे भेलवा स्टेशनला पोहोचणार होती. त्यापुर्वी सिग्नलवर थांबली हाेती. डीपीसी (डिझेल ईएमयू ड्रायव्हिंग पॉवर कार) च्या मागील भागातून धूर निघताना गार्डला दिसला. धूर आणि आग पाहून गाडी भेलवा स्थानकापूर्वीच थांबविण्यात आली.

ही घटना घडताच रेल्वेमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी खाली उतरविण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे रेल्वे विभागाकडून कळविण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply