नवी दिल्ली :गुजरात निवडणुकीसाठी AAP ची तयारी, पंजाबच्या ‘चाणक्या’कडे दिली जबाबदारी

नवी दिल्ली : पंजाबमधील घवघवीत यशानंतर आम आदमी पक्षाने आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. आपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी  जोरदार तयारी सुरू केली असून पंजाब निवडणुकीतील विजयाचे चाणक्य डॉ. संदीप पाठक  यांना गुजरातची जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पंजाब निवडणुकांमध्ये आपला घवघवीत यश मिळालं आहे. या विजायचं श्रेय डॉ. पाठक यांना दिले जाते. त्यांना या विजयाचे चाणक्य मानले जाते. त्यामुळे आता आपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. संजय पाठक यांना प्रभारी बनवले आहे. तसेच त्यांच्या कामावर खुश होऊन राज्यसभेची उमेदवारी देखील दिली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने चांगली कामगिरी केली असून दिल्ली सोडून दुसऱ्या राज्यात प्रथमच आपले सरकार स्थापन केले आहे. त्याचबरोबर आता इतर राज्यांची सत्ता मिळविण्याकडे पक्षाचे लक्ष लागले असून आतापासूनच पक्षाने तयारी सुरू केली आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यात चांगलं यश मिळावं यासाठी आपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी या निवडणुकांसाठी महत्वाचं पाऊल उचललं असून हिमाचल प्रदेशसाठी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना निवडणूक प्रभारी, तर दुर्गेश पाठक यांना राज्य प्रभारी बनवण्यात आले आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलासचे आमदार सौरभ भारद्वाज यांना हरियाणाचे निवडणूक प्रभारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर द्वारकाचे आमदार विनय मिश्रा यांना राजस्थानचे निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. राघव चढ्ढा यांना पंजाबच्या सहप्रभारी पदावरून मुक्त करण्यात आले असून आता ही जबाबदारी डॉ. संदीप पाठक सांभाळणार आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply