धुळे : मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३३ जणांवर कारवाई

धुळे : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पोलिसांतर्फे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यात ३३ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पोलिसातर्फे बेशिस्त वांधारकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. यामध्ये धुळे शहरातील विविध ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे ग्रस्त घालण्यात आलेली होती. यादरम्यान मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या 33 वाहन चालकांवर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या 6 बेसिस्त बुलेट धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर वाहन चालवताना कानाला फोन लावून वाहने चालवणाऱ्या आठ वाहनधारकांवर देखील कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या बारा वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर बिना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 15 दुचाकी धारकांवर कारवाई करण्यात आली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *