धुळे : तीन कार, ट्रकचा विचित्र अपघात; कारमधील चार जण जखमी

धुळे : मुंबई– आग्रा महामार्गावर स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव चालणाऱ्या वाहन धारकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागून येणाऱ्या दोन कार व त्यांच्या पाठीमागे असलेल्या ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. 

धुळे तालुक्यातील आर्वी येथे  मुंबई– आग्रा महामार्गावर स्पीड ब्रेकरजवळ पुढील कार अचानक थांबली. यामुळे पाठीमागून भरदाव वेगाने येणाऱ्या दोनही कार एकमेकांवर जाऊन आदळल्या. तर त्यांच्या पाठीमागे भरधाव वेगाने येणारा ट्रकने देखील या तीनही कारला पाठीमागून जबर धडक दिली.

तीन कार व ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वाहनातील तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आर्वी पोलीस ठाणे समोरच हा विचित्र अपघात झाल्यामुळे तात्काळ पोलिसांनी धाव घेत बचावकार्य करीत महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक तात्काळ सुरळीत केली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *