“देवेंद्ररुपी कृष्ण, कर्णरुपी एकनाथ…” महाभारताचा दाखला देत आशिष शेलारांचं राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य

मुंबईतील भाजपा मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी महाभारतातील युद्धाचा दाखला देत राज्यातील राजकीय परिस्थिती उलगडून सांगितली. “महाभारत बदलत चाललं आहे, देवेंद्ररुपी कृष्णाने कर्णरुपी एकनाथाला युद्धातून बाजूला काढले” असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला चिमटा काढला. भ्रष्ट्राचाराविरोधातील या लढाईत कृष्ण आणि कर्ण हे दोघेही आमच्या सोबत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये भाजपाचा महापौर आता कोणीही थांबवू शकत नाही, असा दृढ विश्वास शेलार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाची सत्ता येईल, असे शेलार यावेळी म्हणाले. ४५ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई पालिकेवर सत्ता असतानाही शिवसेनेनं मुंबईकरांना सेवा पुरवल्या नाहीत, असा आरोप शेलारांनी केला.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *