दसरा मेळावा 2022 : “धिंगाणा घालायचा नाही,” पंकजा मुंडेंनी तंबी दिल्यानंतरही समर्थकांचा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज

दसरा मेळावा 2022 : विजयादशमीच्या निमित्ताने भगवान भक्तीगडावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून आयोजित दसरा मेळाव्याला समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी समर्थकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पंकजा मुंडे यांचं भाषण संपताच समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे पोलिसांवर गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याची वेळ आली.

भाषणाच्या सुरुवातीला पंकजा मुंडे यांनीही गोंधळ घालणाऱ्यांना शांत बसण्याचं आवाहन केलं होतं. “माझं भाषण होईपर्यंत हाताची घडी, तोंडावर बोट पाहिजे. ही धिंगाणा घालण्याचं ठिकाण नाही,” असं सांगत त्यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना तंबी दिली होती.

दरम्यान पंकजा मुंडे यानी यावेळी भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. “माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही असा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे असंही त्यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply