पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे नवव्या सभागृहातील (२०१७-२०२२) पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रविवारी (ता.२०) मध्यरात्री बारा वाजता संपुष्टात आला. यामुळे रविवारी रात्री झोपताना आजी असलेले असलेले पदाधिकारी व सदस्य सोमवारी सकाळी झोपेतून उठताना मात्र माजी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे सोमवारी (ता.२१) सकाळी दहा वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी झेडपीच्या प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली. परिणामी तब्बल ३२ वर्षांच्या खंडानंतर जिल्हा परिषदेवर पुन्हा प्रशासकराज सुरु झाले आहे.
नवे प्रशासक प्रसाद यांनी सूत्रे स्वीकारताच प्रशासक म्हणून भीमाशंकर येथील नवीन विश्रांतीगृहासाठीच्या इमारतीचे उद्घाटन केले. या इमारतीसाठी मावळत्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी भीमाशंकर येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली होती. याआधी पुणे जिल्हा परिषदेवर १९९० मध्ये प्रशासकराज आले होते. त्यावेळी ३० जून १९९० ते २० मार्च १९९२ पर्यंत म्हणजेच सुमारे पावणे दोन वर्षे जिल्हा परिषदेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती होता. यंदा पुन्हा हे प्रशासकराज आले आहे.
बत्तीस वर्षापूर्वी आलेल्या या प्रशासकराजच्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पवार आणि आर. ए. राजीव या दोघांनी प्रशासक म्हणून कारभार हाकला होता. त्यानंतर आयुष प्रसाद प्रशासक असलेले तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रशासक नियुक्तीबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. या राजपत्रात राज्यातील २५ जिल्हा परिषदांवर २१ मार्च २०२२ पासून किमान चार महिने किंवा नवीन पदाधिकारी सत्तारूढ होईपर्यंत या जिल्हा परिषदांचा कारभार प्रशासक पाहतील, असे नमूद केले आहे. यामुळे यापुढची किमान चार महिने तरी जिल्हा परिषदेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्र सरकारने केलेल्या ७३ व्या घटनादुरुस्तीमधील तरतुदीनुसार पंचायतराज संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मुदतवाढ देता येत नाही. विद्यमानांना मुदतवाढ देण्यात असलेल्या कायदेशीर अडचणी आणि मुदतीत निवडणुका घेणे अशक्य असल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील पुणे व सातारा या दोन जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ विनय हे गौडा यांनी याआधी नंदूरबार जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून काम केले असून आता ते सातारा जिल्हा परिषदेचे प्रशासक झाले आहेत. पुण्याचे सीईओ आयुष प्रसाद यांनी याआधी अकोला जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून आठ महिने काम केले आहे.
सरकारी गाड्या जमा, दालने कुलूपबंद दरम्यान, कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सरकारी गाड्या जिल्हा परिषद प्रशासनाकडे जमा केल्या आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींची दालने प्रशासनाकडून कुलूप लाऊन बंद करण्यात आली आहेत. दालनांच्या प्रवेशद्वारावरील नामफलक काढून टाकण्यात आले आहेत.हे पण वाचा-
शहर
- विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणधुमाळी; १७ पैकी १५ जागांवर एकमत, २ जागांचा तिढा लवकरच सुटणार!
- नेत्यांचे पगार कमी करा, चार्टर्ड प्लेनवर बंदी आणा! महागाईवर बाबा बागेश्वर यांचा सरकारला संतप्त सवाल.
- अंबरनाथ नगरपालिकेत हायव्होल्टेज ड्रामा! मुख्याधिकाऱ्यांच्या 'गैरहजेरी'वर भाजपचा संताप; चक्क रिकाम्या खुर्चीला घातला हार!
- १० पैकी ४ भारतीय खातात 'चॉकलेट फ्राईज'! तुम्ही ट्राय केलं का हे व्हायरल कॉम्बिनेशन? नवीन अहवालातून धक्कादायक खुलासा.
महाराष्ट्र
- विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणधुमाळी; १७ पैकी १५ जागांवर एकमत, २ जागांचा तिढा लवकरच सुटणार!
- नेत्यांचे पगार कमी करा, चार्टर्ड प्लेनवर बंदी आणा! महागाईवर बाबा बागेश्वर यांचा सरकारला संतप्त सवाल.
- अंबरनाथ नगरपालिकेत हायव्होल्टेज ड्रामा! मुख्याधिकाऱ्यांच्या 'गैरहजेरी'वर भाजपचा संताप; चक्क रिकाम्या खुर्चीला घातला हार!
- १० पैकी ४ भारतीय खातात 'चॉकलेट फ्राईज'! तुम्ही ट्राय केलं का हे व्हायरल कॉम्बिनेशन? नवीन अहवालातून धक्कादायक खुलासा.
गुन्हा
- पुणे: हडपसरमध्ये आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, संतापलेल्या कार्यकर्त्यांसह दारू अड्डा केला उद्ध्वस्त!
- लखनऊ; महिला पोलीस निरीक्षकाचा सासरच्या मंडळींकडून छळ; सासऱ्याने केली अमानवीय मारहाण!
- पुण्यातील कासुर्डीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; पदवी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यास यवत पोलिसांकडून अटक.
- अहिल्यानगर: पदोन्नतीचा आनंद मावळला! लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कार्यमुक्तीच्या दिवशीच गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे: हडपसरमध्ये आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, संतापलेल्या कार्यकर्त्यांसह दारू अड्डा केला उद्ध्वस्त!
- "२०२९ ला दिलीप मोहिते पुन्हा आमदार होतील"; वाढदिवसानिमित्त अशोक पवारांचा विश्वास, खेडच्या राजकारणात चर्चांना उधाण!
- पंजाबच्या स्थानिक निवडणुकीत भाजपाची मोठी पिछेहाट; आम आदमी पक्षाचे 'बल्ले बल्ले'!
- कर्नाटकातील सत्तासंघर्षाचा शेवट: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; प्रियांका गांधींच्या मध्यस्थीनंतर डी.के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- आजचे राशिभविष्य (२८ मे २०२६): नवपंचम योगाचा शुभ संयोग; तूळसह 'या' राशींना होणार अचानक धनलाभ!
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
मनोरंजन
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- रशिया-तालिबानचा 'डिफेन्स' करार; पाकिस्तानच्या गोटात घबराट! अजित डोवालांच्या 'मास्टरप्लॅन'ची चर्चा.
- दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 'लक्झरी' खुर्चीवरून गदारोळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप.
- चीनची मक्तेदारी मोडीत! दुर्मिळ खनिजांसाठी भारत-अमेरिकेचा ऐतिहासिक करार; 'क्वाड' देशांची मोठी साथ.
- केनियात अग्नितांडव! मुलींच्या वसतिगृहाला लागलेल्या भीषण आगीत १६ विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू; अनेक जण जखमी.






















Subscribe to my channel




