
ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्या संपर्क साधला जात असला तरी जिल्ह्यातील शिवसेनेत फुट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक शिवसैनिकांनी समाजमाध्यमांवरून शिंदे समर्थक असल्याचे संदेश दिले आहेत. तर, काहींनी शहरात तशाप्रकारचे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे, शिंदे यांच्याविरोधात प्रतिक्रीया उमटताना दिसून येत नाही. तसेच शिंदे यांच्या बंडानंतर काही शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक गोंधळून गेले असून शिवसेनेसोबत की शिंदे यांच्यासोबत राहयचे, अशी त्यांची दुहेरी मनस्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांनी आस्ते कदम ची भुमिका घेत मौन धारण केल्याचे दिसून येत आहेत.
ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यात शिवसेनेची पायामुळे घट्ट रोवली. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हयाची सुत्रे आली. त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविली आणि त्याचबरोबर शिवसैनिकांशी नाळ जोडली. विशेष म्हणजे, मुंबईमध्ये शिवसैनिकांकडून शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने केली जात असली तरी ठाणे जिल्ह्यात मात्र शिवसैनिकांकडून कोणतीही प्रतिक्रीया उमटलेली नाही. यातूनच जिल्ह्यातील शिवसेनेत फुट पडणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्या संपर्क साधला जात असला तरी त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश येताना दिसत नाही. शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यातील शिवसेना, युवासेनेचे पदाधिकाऱ्यांनी उघडपणे शिंदे समर्थक असल्याचे समाजमाध्यांवरून संदेश देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे येथील कळवा भागात माजी महापौर गणेश साळवी यांनी आम्ही शिंदे समर्थक असल्याचे फलक लावले आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच गुवाहाटी येथे आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर या बालेकिल्ल्याला अभेद्य राखणाऱ्या शिंदे यांनीच बंडाचे निशाण फडकविल्याने काही शिवसैनिक गोंधळून गेले आहेत.
एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडणार की काय अशी शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांच्या मागे उघडपणे उभे राहायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठींबा द्यायचा याबाबत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी यांच्यात संभ्रम आहे. खासगीत बोलताना बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदे यांनाच पाठींबा देणार असल्याचे सांगत असले तरी सध्या उघडपणे कुणी समोर येऊन भूमिका मांडताना दिसत नाहीत. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण, शहापूर या भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे यांनी या भागात मोठया प्रमाणात विकासकामांना निधी दिला. त्यामुळे त्यांच्या आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागे मोठा जनाधार आहे. मात्र आणखी काही दिवस चित्र स्पष्ट होण्याची वाट पदाधिकारी पाहत आहेत. अनेकांनी समाज माध्यमांवर एकनाथ शिंदे यांचे फोटो ठेवत अप्रत्यक्ष पाठींबा जाहीर केला आहे. तर अनेकांनी जाहीर फेसबुक पोस्ट लिहून आपला पाठींबा व्यक्त केला आहे.
कल्याणमध्येही फुटीची शक्यता
कल्याण, डोंबिवली तसेच २७ गाव परिसरातील शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ते पदाधिकारी यांना नावाने ओळखणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षात अनेक कार्यकर्त्यांना पक्षातील मानाची पदे, स्वप्नात नसलेल्या पदाधिकाऱ्याला महापौर, आमदारकीची उमेदवारी देऊन पक्षासह शहर, कार्यकर्त्याला मोठे करण्याचा प्रयत्न केला. याची जाणीव असलेला या भागातील शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता गेल्या दोन दिवसांपासून शिंदे यांच्या बंडाळीमुळे शांत असून, हा निष्ठावान शिवसैनिक शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची माहिती शिवसेनेतील जुन्या जाणत्यांनी दिली. मुंबईतील शिवसेनेच्या एका प्रवक्त्याच्या समर्थक, प्रवक्त्याचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा डोंबिवलीतील एक पदाधिकारी सोडला तर डोंबिवली, कल्याणमधील बहुतांशी सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे यांच्या सोबत असतील, असे या ज्येष्ठ शिवसैनिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला या भागातील शिवसैनिक नंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने निष्ठेने अनेक वर्ष काम करत आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे अगदी जवळचे आहेत. त्यामुळे हा कट्टर शिवसैनिक शिंदे यांच्या साथीने नव्या शिवसेनेला साथ देईल. शिवसेनाप्रमुखांना मानणारा शिवसेनेतील कल्याण डोंबिवली भागातील एका मोठा वर्ग पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याने प्रत्येकाच्या मनाला एक टोचणी आहेच, असेही शिवसैनिकांनी सांगितले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


