जालना - शिवसेनेचे 12 खासदार संपर्कात शिंदे गटात येण्याच्या तयारीत; रावसाहेब दानवेंचा दावा

जालना - शिवसेनेचे 12 खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. हे बारा खासदार शिंदे गटाच्या मूळ शिवसेनेत येणार असल्याचा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला आहे. ते जालन्यात बोलत होते. पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, मुलायम सिंग यांच्या पक्षाप्रमाणेच शिवसेनेकडे निवडणूक चिन्ह देखील राहणार नसल्याचं सांगत न्यायालयाने आधी काही दिलेल्या निर्णयाचा दाखला दिल्यास खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे हे सिद्ध होईल असंही दानवे म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था भाजप मित्र पक्षांच्या मदतीने स्वबळावर निवडणूक लढवेल शिंदे गटाशी देखील चर्चा केली जाईल असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिल्यास त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू असंही सांगायला दानवे विसरले नाहीत.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं 27 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं असून या निवडणुकीत भाजप ओबीसींना पूर्ण न्याय देईल असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *