जम्मू-काश्मीर : पुलवामा येथे ग्रेनेड हल्ला, एक प्रवासी मजूर ठार, दोन जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे ग्रेनेडने ही घटना घडवली.

पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड फेकले आहे. याबाबद जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे. सध्या परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. याआधी जूनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये परप्रांतीय मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.

मोहम्मद मुमताज असे मृत मजुराचे नाव असून तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी आहे. तर मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल अशी जखमींची नावे आहेत. हे दोघेही बिहारमधील रामपूरचे रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या कामगारांवर हल्ले वाढवले ​​होते, पण गेल्या दोन महिन्यांपासून अशा टार्गेट किलिंगच्या घटना कमी झाल्या होत्या.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत दहशतवाद्यांचा हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील आलोचीबाग भागात पोलीस दलावरही हल्ला केला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शोपियान जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. आगलार जैनपोरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात चार मजूर जखमी झाले. बडगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक स्थलांतरित कामगार ठार झाला तर अन्य एक जखमी झाला. अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडल्या आहेत.

श्रीनगर शहरातील लालबाजार भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस शहीद झाला तर दोन जण जखमी झाले.लाल बाजार भागातील जीडी गोयंका शाळेजवळ पोलिस नाकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद जागीच ठार झाले, तर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अबू बकर जखमी झाले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply