चंदननगर, खराडी, वडगावशेरी भागात कचर्‍याची समस्या

रामवाडी - चंदननगर खराडी वडगावशेरी भागात काही ठिकाणी चक्क रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात राहणारे तसेच त्या भागातून ये-जा करणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा वेळेवर उचला जावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही मोहीम राबवली जात आहे. पण चंदननगर खराडी रोड मातोश्री गृहरचना सोसायट्या समोर , गलांडेनगर, जुना मुंढवा रोड, मोझेस वाडी, अशा ठिकाणी रस्त्यावर कचर्‍याचे ढीग दिसुन येत आहे. या कचर्‍याच्या उपजीविका करणारे मोकाट जनावरे कडून कचरा विखुरला जात आहे. कचर्‍यामुळे चिलटे माश्यांचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे.परिसरातील स्वच्छता वर प्रशासनाने भर दिला जावा अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.

नागरिकांकडून घरातील व शारीरिक स्वच्छता राखली जात आहे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.रात्रीच्या वेळेस काहीजण येथे कचरा आणून टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply