गुवाहटी : सात दिवसांसाठी 70 खोल्या बुक; खाण्यापिण्यासह एकनाथ शिंदेंचा दररोज हाेताेय इतका खर्च

गुवाहटी : शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत 80 टक्के पेक्षा जास्त शिवसेनेच्या आमदारांनी बंडखाेरी केल्याने राज्यात कार्यरत असलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार काेसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र बाहेर असलेले हे सर्व आमदार आधी सूरत आणि आत्ता गुवाहटीतील अलिशान हाॅटेलमध्ये वास्तव्यास आहेत. बंडखाेर आमदारांसह मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीसाठी राहिलेल्या एकूण 55 जणांसाठी तब्बल हाॅटलेच्या 70 खोल्या सात दिवसांसाठी 'बुक' झाल्याचे समजते. हे बुकींग कोणी केले आहे अद्याप समाेर आलेले नसले तरी हा सर्व खटाटाेप करण्यासाठी लाखाे रुपयांचा खर्च हाेत असल्याचे स्पष्ट हाेत आहे.

लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी येथून राष्ट्रीय महामार्ग 37 वर सुमारे अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या गुवाहाटीमधील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक 'रॅडिसन ब्लू' (Radison Blu) आहे. गेल्या दाेन दिवसांत हे हॉटेल राजकीय केंद्र बनले आहे. त्याला विशेष कारण देखील आहे. या हाॅटेलमध्ये सध्या शिवसेनेचे सुमारे 40 ते 42 बंडखाेर आमदार तळ ठोकून आहेत. ज्यांच्या भुमिकेमुळे ठाकरे सरकार धाेक्यात आले आहे.

रॅडिसन ब्लू हे हाॅटेल पंचतारांकित आहे. सध्या येथे राहत असलेल्या आमदारांना मिळणा-या सुविधांसाठी लाखाे रुपये खर्च हाेत असल्याचे या हाॅटेलच्या दरावरुन स्पष्ट हाेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या 70 खोल्या सात दिवसांसाठी 'बुक' करण्यात आल्या आहेत. त्याचे बुकींग काेणी केले हे मात्र समजू शकलेले नाही. शिवसेना आणि अपक्षांसह सुमारे 55 जण या हाॅटेलमध्ये आहेत. सात दिवसांसाठी सुमारे 56 लाख रुपये खर्च असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय खाण्यापिण्यासह इतर खर्च दररोज आठ लाख रुपये आहे. याचा अर्थ सात दिवसांसाठी एक कोटी 12 लाख रुपये येऊ शकताे.

यामध्ये चार्टर्ड फ्लाइटचा खर्च, विमानतळ ते हॉटेलपर्यंतचे वाहनाच्या शुल्काची भर पडणार आहे. याव्यतिरिक्त, इतर खर्च आहेत. संबंधित हॉटेलच्या संकेतस्थळावर गेल्यावर या हॉटेलच्या सर्व खोल्या जून अखेर बुक असल्याचे दिसून येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply