
गुवाहटी : शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत 80 टक्के पेक्षा जास्त शिवसेनेच्या आमदारांनी बंडखाेरी केल्याने राज्यात कार्यरत असलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार काेसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र बाहेर असलेले हे सर्व आमदार आधी सूरत आणि आत्ता गुवाहटीतील अलिशान हाॅटेलमध्ये वास्तव्यास आहेत. बंडखाेर आमदारांसह मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीसाठी राहिलेल्या एकूण 55 जणांसाठी तब्बल हाॅटलेच्या 70 खोल्या सात दिवसांसाठी 'बुक' झाल्याचे समजते. हे बुकींग कोणी केले आहे अद्याप समाेर आलेले नसले तरी हा सर्व खटाटाेप करण्यासाठी लाखाे रुपयांचा खर्च हाेत असल्याचे स्पष्ट हाेत आहे.
लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी येथून राष्ट्रीय महामार्ग 37 वर सुमारे अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या गुवाहाटीमधील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक 'रॅडिसन ब्लू' (Radison Blu) आहे. गेल्या दाेन दिवसांत हे हॉटेल राजकीय केंद्र बनले आहे. त्याला विशेष कारण देखील आहे. या हाॅटेलमध्ये सध्या शिवसेनेचे सुमारे 40 ते 42 बंडखाेर आमदार तळ ठोकून आहेत. ज्यांच्या भुमिकेमुळे ठाकरे सरकार धाेक्यात आले आहे.
रॅडिसन ब्लू हे हाॅटेल पंचतारांकित आहे. सध्या येथे राहत असलेल्या आमदारांना मिळणा-या सुविधांसाठी लाखाे रुपये खर्च हाेत असल्याचे या हाॅटेलच्या दरावरुन स्पष्ट हाेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या 70 खोल्या सात दिवसांसाठी 'बुक' करण्यात आल्या आहेत. त्याचे बुकींग काेणी केले हे मात्र समजू शकलेले नाही. शिवसेना आणि अपक्षांसह सुमारे 55 जण या हाॅटेलमध्ये आहेत. सात दिवसांसाठी सुमारे 56 लाख रुपये खर्च असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय खाण्यापिण्यासह इतर खर्च दररोज आठ लाख रुपये आहे. याचा अर्थ सात दिवसांसाठी एक कोटी 12 लाख रुपये येऊ शकताे.
यामध्ये चार्टर्ड फ्लाइटचा खर्च, विमानतळ ते हॉटेलपर्यंतचे वाहनाच्या शुल्काची भर पडणार आहे. याव्यतिरिक्त, इतर खर्च आहेत. संबंधित हॉटेलच्या संकेतस्थळावर गेल्यावर या हॉटेलच्या सर्व खोल्या जून अखेर बुक असल्याचे दिसून येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


