गुजरात : 2988 किलो ड्रग्ज प्रकरणी 16 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

अहमदाबाद : गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर गेल्या वर्षी पकडलेल्या 2988 किलो हेरॉईनप्रकरणी तपास यंत्रणेनं (NIA) आरोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणी एनआयएनं (National Investigation Agency) एकूण 16 जणांना आरोपी बनवलंय. NIA ने सोमवारी गुजरातमधील बंदरातून भारतात 2,988 किलो अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी 11 अफगाण नागरिक आणि एका इराणीसह 16 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. हे आरोपपत्र एनआयएच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलंय. हे संपूर्ण प्रकरण मागील वर्षीच्या 13 सप्टेंबरचं आहे. दरम्यान, महसूल गुप्तचर विभागानं (DRI) गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 2,988 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. NIA ने सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 2,988.21 किलो मादक पदार्थ (हेरॉईन) जप्त केलंय. या प्रकरणात परदेशी नागरिकांचा सहभाग असून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. एनआयएच्या आरोपपत्रात तामिळनाडूतील चेन्नईचे माचावरम सुधाकर, दुर्गा पूरन गोविंदराजू वैशाली, कोईम्बतूरचे राजकुमार पेरुमल, गाझियाबादमधील साहिबाबादचे प्रदीप कुमार आणि 11 अफगाण नागरिकांचा समावेश आहे. एनआयएच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या 2988 किलो हेरॉईनच्या तपासात असं आढळून आलंय की, अफगाणिस्तानातील कंदहार येथील हसन हुसैन लिमिटेड कंपनीच्या नावानं इराणच्या बांदार अब्बास बंदरातून पाठवण्यात आलं होतं. हे आशी ट्रेडिंग कंपनीनं भारतात आयात केलं होतं. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचंही एनआयएचं म्हणणं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply