
अकोले : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारात कोल्हार घोटी रस्त्यावर असलेल्या ओढ्यात औरंगाबाद येथील पर्यटकांच्या गाडीला काल रात्री अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटा मधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिसरा काचेतून उडी मारून बचावला. त्याचवेळी बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्द पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेला. ट्रॅक्टर आणि जेसीबीने गाडी बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
मिळालेली माहिती अशी, औरंगाबाद येथील वकिल आशिष प्रभाकर पोलादकर,वय ३४ रा.पोलाद तालुका सिल्लोड, रमाकांत प्रभाकर देशमुख (वय ३७) रा. ताड पिंपळगाव, ता.कन्नड,वकील अनंत रामराव मगर (वय ३६) रा.शिंगी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील युवक संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. जवळच असणाऱ्या भंडारदरा आहे, तो पाहण्यासाठी ते आले होते. त्यांना भंडारदरा येथे जायचे होते, मात्र त्यांचा रस्ता चुकला ते सरळ वाकी मार्गे वारूंघुशी फाट्याच्या पुढे गेले रस्ता चुकला लक्षात आल्यावर ते रात्री साडेआठ वाजता ते कळसुबाईकडून भंडारदराच्या दिशेने येत होते.
यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची क्रेटा कार थेट सरकत जाऊन कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. याचवेळी बोलेरो गाडीतून एक प्रवाशी लघु शंकेसाठी थांबला होता, पण नदीच्या पाण्याचा प्रवाहात तोही वाहून गेला. आज शनिवारी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
ही घटना परिसरातील शेंडी येथील राजू बनसोडे, दीपक आढाव या दोन युवकांनी पाहिली. त्यांनी तात्काळ राजूर पोलिसांना याची महाती दिली. राजुर पोलीस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. मुसळधार पाऊस, घोंगवणारा वारा तरीही अंधारात सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, हेड कॉ्स्टेबल काळे, दिलीप डगळे, अशोक गाडे, विजय फटांगरे आदी पोलिसांनी मदत कार्य हातात घेत ग्रामस्थांच्या मदतीने रात्री साडेदहा वाजता अपघातग्रस्त क्रेटा जेसीबीच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढली.
रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान, बुडालेल्या युवकांचा मृतदेह घटनास्थळापासून ३०० फुटावर सापडला. रात्री उशिरापर्यंत पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. गेल्या दहा दिवसांपासून भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस सुरू आहे. या पावसातही पर्यटक पाऊस व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भंडारदरा परिसराकडे येत आहेत. परंतु पावसामुळे या भागातील रस्ते व वाटा निसरड्या झाल्या आहेत. वळणाच्या ठिकाणी पाऊस व धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. आज याच कारणामुळे तीन युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी - भंडारदऱ्याला येणाऱ्या पर्यटकांनी दिवस असेपर्यंतच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राजुर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
अॅड. आशिष पालोदकर हे अविवाहित होते. ते खडकेश्वर येथे आई, वडिलांसह राहत होते व जिल्हा कोर्टात वकिली करीत होते. रमाकांत देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. ते शेती करत होते. वाचलेला मित्र अनंत आपल्या मित्रांचे मृतदेह पाहून ओक्साबोक्शी रडू लागला, आणि बेशुद्ध पडला. त्याला राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शहर
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
महाराष्ट्र
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



