कोलंबो : आमची मातृभूमी वाचवा; श्रीलंकेच्या विरोधकांची PM मोदींना भावनिक साद

कोलंबो : श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटात  तेथील विरोधकांनी भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजीथ प्रेमदासा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना त्यांच्या देशाला जास्तीत जास्त प्रमाणात मदत करण्याचे आवाहन केले. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट केले आहे. 

कर्जबाजारात मोठया प्रमाणात बुडालेला श्रीलंका सध्या दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे, कमी होत चाललेले परकीय चलन, इंधन आणि अन्नाची तीव्र टंचाई यामुळे येथील जनतेला भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. या सर्वामध्ये श्रीलंकेतील विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासाने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश देत, कृपया श्रीलंकेला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा. ही आमची मातृभूमी असून, आम्हाला आमची मातृभूमी वाचवायची आहे. असे भावनिक साद घातली आहे.

आर्थिक संकटामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटादरम्यान, प्रेमदासा म्हणाले की, राजीनामे हा श्रीलंकेला दिलासा देण्याचा खरा प्रयत्न नसून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. “हा एक मेलोड्रामा आहे जो देशातील जनतेची फसवणूक करण्यासाठी केला जात असून, देशातील जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याच्या दिशेने हा खरा प्रयत्न नसल्याचे म्हणत, जनतेला मूर्ख बनवण्याची ही कसरत आहे असल्याची टीका प्रेमदासा यांनी केली आहे.

दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी विरोधी पक्षांना राष्ट्रीय संकटावर तोडगा काढण्यासाठी एकता सरकारमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण पाठवून मंत्रीपदे घेण्याचे आवाहन केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply