पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या काळात जिवावर उदार होऊन काम केलेले कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाने केली आहे. हे तात्पुरते आरोग्य कर्मचारीच खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत. या सर्व कोरोना योद्ध्यांना आरोग्य सेवेत कायम न केल्यास रस्त्यावर उतरू, असा गंभीर इशारा भारतीय मजदूर संघाने दिला आहे.
राज्यातील सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात हजारो जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर कोरोना महामारीच्या काळात कंत्राटी पद्धतीने अनेकांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिली होती. कोरोनावर मात करण्यासाठी या सर्वांनी जिवावर उदार होऊन काम केले आहे. त्यामुळे यापैकी एकाही कामगाराला किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघाचे सरचिटणीस दीपक कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. १४) पुण्यात झालेल्या कामगारांच्या मेळाव्यात बोलताना दिली.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शहरी व ग्रामीण भागातील लाखो नागरिक भयभीत झाले होते. या महामारीवर मात करण्यासाठी प्रशासन पातळीवर मनुष्यबळ कमी पडल्याने प्रशासनाने परिचारिका (नर्सेस), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता (फार्मासिस्ट), चतुर्थ श्रेणी कामगार, वैद्यकीय अधिकारी आदी विविध पदांवर तात्पुरत्या नेमणुका केल्या होत्या. या सर्व कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी आपापला जीव धोक्यात घालून स्वतःची व कुटुंबाची काळजी न करता समाजहिताचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या कामगारांना कामगार कायद्यानुसार समान काम समान वेतन मिळणे आवश्यक असताना अनेकांना किमान वेतनापासून वंचित राहावे लागते आहे, असा आरोपही या मेळाव्यात करण्यात आला.
सरकारी निर्णयानुसार या कामगारांना कोरोना भत्ता मिळणे आवश्यक असतानाही तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही. यापैकी अनेकांना तर, साप्ताहिक सुट्टी, बदली सुट्टी, जास्त कामाचा मोबदलासुद्धा (ओव्हरटाईम) मिळाला नाही. कायद्यानुसार भविष्य निर्वाह निधीचे अंशदान वजावट करणे आवश्यक होते. ही अंशदान रक्कम वजावट केली नाही. या काळात सेवेत कार्यरत असताना ज्या कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना अद्यापपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही.
मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना सरकारी सेवेत नोकरी देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याचे भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.या मेळाव्याला भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय सदस्य चंद्रकांत धुमाळ, रवींद्र देशपांडे, भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांबळे, भाग्यश्री बोरकर, अनिता पवार, मनिषा जरांडे आदींनी मार्गदर्शन केले.हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
