
महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे १२ खासदारदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. अशीच एक सभा काल संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडली. या सभेमध्ये शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. “एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले?” असा प्रश्न खैरे यांनी जाहीर सभेमध्ये उपस्थित करत शिंदेंवर टीका केली.
चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच येथे जमलेले सर्वजण हे ठाकरेंच्या पाठीशी आहेत, असं सांगितलं. “इथे जे जमले आहेत ते ठाकरे परिवाराचे समर्थक आहेत. ही जनता फक्त ठाकरे कुटुंबाला मानते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आपण (आदित्य ठाकरे),” असं खैरे मंचावर बसलेल्या आदित्य ठाकरेंकडे पाहत म्हणाले. पुढे बोलताना, “आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं,” असं ते म्हणाले.
खैरे यांनी या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंवर जाहीर टीका केली. “मला एक आश्चर्य वाटतं १९८८ च्या नंतर एक रिक्षावाला एवढे कोट्यवधी रुपये कसे जमा करु शकतो?” असा प्रश्न उपस्थित करत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. “त्यांच्या पाठीमागे ईडी का नाही. आमच्या एक एका कार्यकर्त्यांमागे ईडी लावता तुम्ही तर यांच्या पाठीमागे का नाही?” असा प्रश्नही खैरे यांनी विचारला
“५०-५० खोके दिले (बंडखोर आमदारांना). किती खर्च केले? इतके पैसे कुठून आणले रिक्षावाला असणाऱ्या दाढीने? किती लुटले?” असे प्रश्नही खैरे यांनी विचारले. तसेच पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असणाऱ्या आनंद दिघेंचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. “आनंद दिघे साहेबांच्या आशिर्वादाखाली तू मोठा झाला आणि आनंद दिघेंना विसरुन गेला. त्यांच्या चित्रपटात दाखवलंय ना गद्दारांना क्षमा नाही. काही लपणार नाही. मुंबई ठाण्याच्या लोकांना कळू लागलंय,” असंही खैरे म्हणाले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

