‘एआयसीटीई’कडून दोन अभ्यासक्रमांना मान्यता; सेमीकंडक्टर, चिपनिर्मितीला बळ देण्यासाठी निर्णय

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना डिप्लोमा इन आयसी मॅन्युफॅक्चिरग, बीटेक/बीई इन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअिरग (व्हीएलएसआय डिझाइन अँड टेक्नॉलॉजी) हे अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारतअंतर्गत केंद्र सरकारने सेमीकंडक्टरची देशातच निर्मिती करण्यासाठी योजना सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एआयसीटीईकडून सेमीकंडक्टर आणि चिपनिर्मितीसंबंधित दोन अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन विकसनासाठी देशात पूरक वातावरण निर्मिती करण्यास केंद्रीय मंत्रालयाने मान्यता दिली आहे. मात्र पूरक वातावरण निर्मिती करताना सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादनासाठी कुशल, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्या दृष्टीने क्षमतावृद्धीचा भविष्यवेधी आराखडा असणे आवश्यक असल्याचे एआयसीटीईने नमूद केले आहे. पदवीपूर्व आणि पदविका स्तरावरील हे अभ्यासक्रम असून, वाहन, विद्युत, इलेक्ट्रॉनिक अशा विविध क्षेत्रांत आवश्यक सेमीकंडक्टर विकसनासाठी केंद्रीय पातळीवरून प्रयत्न होत असताना या अभ्यासक्रमांद्वारे या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ घडवण्याचा एआयसीटीईचा विचार आहे. डिप्लोमा इन आयसी मॅन्युफॅक्चिरग, बीटेक/बीई इन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअिरग (व्हीएलएसआय डिझाइन अँड टेक्नॉलॉजी) हे अभ्यासक्रम इच्छुक आणि पात्र संस्थांना निकषांची पूर्तता करून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून सुरू करता येतील. या अभ्यासक्रमांचे प्रारूप लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे एआयसीटीईने नमूद केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply