उत्तराखंड : जोशीमठ भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित; संकटाला तोंड देण्यासाठी उपायांचा शोध सुरू

जोशीमठाची जमीन दिवसेंदिवस खचत चालली आहे. अशात काल रविवारी या परिसराला भूस्खलन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. जोशीमठावर आलेलं संकट लक्षात घेता आता मोदी सरकारने यावर उपयोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत या संदर्भात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत बद्रिनाथचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या जोशीमठाच्या भूस्खलनावर चर्चा करण्यात आली. उच्चस्तरीय बैठकीत योग्य त्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

जोशीमठात सध्या ६० घरांमध्ये भूस्खलन होऊन भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना योग्य स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच आसपासच्या परिसरात आणखीन ९० घरे आहेत. या घरांना देखील भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याआधीच त्यांना दुसऱ्या ठिकाणी निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. आणखीन कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी प्रशासन विशेष काळजी घेत असल्याचे गढवालच्या आयुक्तांनी सांगितले आहे. येथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. गुरुवारपासून या पथकाचे प्रमुख परिसरावर लक्ष ठेऊन आहेत. तसेच प्रशासनाने जागोजागी मदत केंद्रही उभारले आहेत.

जोशीमठावर तैनात केलेल्या सुरक्षा पथकाचे प्रमुख कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशीमठमध्ये सर्वच इमारतींचे सर्वेक्षण सुरू आहे. धोकादायक इमारतींचा आकडा यामध्ये वाढताना दिसत आहे. गावात एकूण ४,५०० इमारती आहेत. त्यातील ६१० इमारती धोकादायक झाल्याअसून राहण्यासाठी योग्य नाहीत. या भागात काही महावीद्यालय आणि हॉटेल्स आहेत जे सध्या तातपूरत्या राहण्यासाठी सोईचे आणि सुरक्षित आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

जोशीमठ गावात सुरुवातीला जमिनीला लहान भेगा पडल्या आणि नंतर त्या जास्त प्रमाणात वाढत गेल्या आहेत. घर, रस्ते आमि शेतात भेगा पडत असल्याने सर्वजण जीव मुठीत घेऊन राहत आहेत. अशात गेल्या आठवड्यात शहरात रसत्याखली असलेली जलवाहिनी फुटली होती. याने नागरिकांचे आणखीन हाल झाले. ही परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी बातचीत करत घटनेची सर्व माहिती मिळवली असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नंतर त्यांनी सर्व अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठक घेतली, आणि एनडीआरएफ पथकास सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply