यशराज फिल्म्सच्या “अल्फा” चित्रपटाची खूप चर्चा होती. मात्र सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. “अल्फा” च्या सेटवर आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या ऑनलाइन समोर येत आहेत. यामुळे चाहते हैराण झालेत. मात्र कलाकार किंवा निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत पुष्टीकरण झालेले नाही, असे असले तरी, क्रिएटिव मतभेदांमुळे तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, सेटवर आलिया भट्ट आणि बॉबी देओलमध्ये तणाव निर्माण झाला आहे. बॉबीच्या दृश्यामध्ये आलिया सारख्या सूचना करत असते, त्यामुळे हे मतभेद निर्माण झाले.
त्यानंतर बॉबी देओलने आलिया भट्टच्या सूचनांवर आक्षेप घेतला, ज्यामुळे सेटवर तणाव निर्माण झाला. भांडण टोकाला पोहोचल्यामुळे, परिस्थिती इतकी बिकट झाली की शूटिंग सुरळीत सुरू ठेवण्यासाठी निर्माता आदित्य चोप्रा यांना हस्तक्षेप करावा लागला. चित्रपटाबद्दल वाढत्या चर्चांनंतर आता लेटेस्ट रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की हा चित्रट थिएटरमध्ये रिलीज होणार नाहीये.
डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाशी जवळच्या ऐका सूत्राने माहिती दिली की, “आदित्य चोप्राला अशी आशा होती की ‘मर्दानी’ मधून फीमेल-हीरो जॉनरला चालना मिळेल, त्यामुळे ‘अल्फा’ हा चित्रपट आलियाला हिरो दाखवून, तसचा चित्रपट म्हणून सादर करता येईल. पण ‘मर्दानी ३’ च्या खराब कामगिरीमुळे आणि स्पाय युनिव्हर्सच्या ‘वॉर २’ मधील अपयशानंतर, ‘अल्फा’ हा चित्रपट आता यशराजचा रखडलेला प्रकल्प दिसत आहे.
ओटीटीवर रिलीज होणार अल्फा? आलिया भट्ट नाराज
रिपोर्ट्सनुसार, “अल्फा” चित्रपट आता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, परंतु आलिया भट्टचा याला विरोध आहे. पण कोणतीही पुष्टी झालेली नाही. गेल्या वर्षी, आलिया भट्ट जेद्दा येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने तिच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. “‘अल्फा’ हा YRF विश्वातील पहिला फीमेल-लीड अॅक्शन चित्रपट आहे, म्हणून तो देखील एक धोका आहे, कारण ऐतिहासिकदृष्ट्या दिसलं की असे चित्रपट पुरुष-लीड चित्रपटांइतके चांगले प्रदर्शन करत नाहीत.” त्यामुळे याच्या भविष्याबद्दल साशंकता आहे.
खरंतर अल्फा हा आधी ख्रिसमस म्हणजेच डिसेंबर 2025मध्ये प्रदर्शित होणार होता पण आता तो 17 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होईल. प्रेक्षकांसाठी अल्फाचे व्हीएफएक्स परिपूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे असं सांगत कंपनीने याची पुष्टी केली होती. आता या चित्रटाला कसा प्रतिसाद मिळोत, तो कुठे रिलीज होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

