अडीच वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा टांझानियाचा अमली पदार्थ तस्कर ‘जेम्स’ जाळ्यात, २३ लाख रुपयांचे कोकेन जप्त

पुणे : अडीच वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा अमली पदार्थ तस्कर जेम्स डार्लिंगटन लायमो याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी फथकाने पकडले. त्याच्याकडून २३ लाख २६ हजार रुपयांचे कोकेन, तीन मोबाइल संच, दुचाकी जप्त करण्यात आले.

जेम्स मूळचा आफ्रिकेतील टांझानियाचा आहे. जेम्स अमली पदार्थ तस्कर आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. या प्रकरणात जेम्सच्या मित्राला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन महिन्यांपूर्वी तो हांडेवाडीतील जाधवनगर भागात राहायला आला होता. याबाबतची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून पोलिसांनी पकडले, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

जेम्सविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल ‌झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, ज्ञानेश्वर घोरपडे, सुजीत वाडेकर, विशाल शिंदे, विशाल दळवी, विशाल पारधी, राहुल जोशी, नितेश जाधव यांनी ही कारवाई केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply