सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी तब्बल दाेन महिन्यानंतर गुन्हा दाखल

टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणात वाहन चालवणाऱ्या डॉ. अनाहीता पंडोल यांच्याविरुद्ध कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलगर्जीपणा तसेच बेदरकारपणे वाहन चालवणे अंतर्गत कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात मधील उद्धवाडा येथून धार्मिक कार्यानंतर मुंबईकडे परतताना चारोटी जवळील सूर्या नदीवरील पुलाच्या कठड्याला ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून ३४ मिनिटांच्या सुमारास भरधाव असणाऱ्या मर्सिडीज बेंझ गाडीने धडक दिली होती. या अपघातात सायरस मिस्त्री तसेच जहांगीर पंडोल यांचे निधन झाले होते तर दरायस व डॉ. अनाहीता पंडोल या जखमी झाल्या होत्या.

या प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मर्सिडीज बेंझ इंडिया या कंपनीच्या तांत्रिक तपासणी अहवाल प्राप्त केल्यानंतर तसेच चौकशी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केल्यानांतर हयगयीने भरधाव वाहन चालविण्याच्या व धोकादायक ओव्हरटेके करण्याच्या प्रयत्नात अपघात केल्या प्रकरणी डॉ. अनाहीता पंडोल यांच्या विरोधात हलगर्जीपणा (३०४-अ), बेदरकारपणे वाहन चालवणे (२७९), इतर व्यक्ती जणांचा जीव धोक्यात टाकणे (३३७) व आत्महत्या करण्यास चितावणी देणे (३३८) या भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी चौकशी करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply