बीड : कागदोपत्री वृक्षारोपण, चर खोदण्याची कामे करून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या वनविभागाला आहे, ते वृक्ष वाचविण्यात स्वारस्य नाही. येथील सह्याद्री देवराई वनराई प्रकल्पाला दुसऱ्यांदा आगीच्या घटनेनंतर या विभागाचा कर्तव्यशुन्यपणाचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
या परिसराला कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी ठोस पावले उचलले तर येथील हिरवाई कायम टिकू शकेल. मात्र, दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेली पाइपलाइनचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी या विभागाने कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे एका गावच्या सार्वजनिक पाइपलाइनचे पाणी वापरण्याची मुभा असतानाही टँकर लावले गेले. यामागचा उद्देशही काहीसा वेगळा वाटत आहे.
बीडकरांसाठी वनविभाग व अभिनेते सयाजी शिंदे यांनी परिसरातील पालवणजवळ सह्याद्री देवराई वनराई प्रकल्प उभारला. पालवण शिवारातील हा प्रकल्प बीडकरांसाठी पिकनिक पॉइंटही झाला. परंतु, गत महिनाभरात हा प्रकल्प दोनदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने या परिसरात भेट देणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये या ठिकाणी बीडसह परिसरातील निसर्गप्रेमींची मोठी वर्दळ असते. परंतु, काळ पुढे सरकत चालला तसे या परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी म्हणावी तेव्हढी काळजी घेतली जात नसल्याचे दिसते.
गत महिनाभरात या ठिकाणी दोनदा आगीच्या घटना घडल्या. यात शेकडो वृक्षांना हळ लागली. ही आग कशी लागली, कोणी लावली हा शोधाचा विषय आहे. मात्र, हा वनप्रकल्प टिकविण्यासाठी व जगविण्यासाठी वनविभाग अनुत्सुक असल्याचे दिसते.
या ठिकाणी शाश्वत पाणीपुरवठा झाल्यास झाडांबरोबरच परिसरातील गवत, झुडपेही बारा महिने हिरवीगार होऊ शकतील. त्यासाठी पाइपलाइनचे काम पूर्ण करून अंतर्गत भागात ती फिरवल्यास या परिसरातील हिरवळ कायमस्वरूपी टिकू शकेल.
कायमस्वरूपी चौकीदार गरजेचा
विशेष म्हणजे या ठिकाणी कायमस्वरूपी चौकीदार गरजेचा आहे. परिसरात सकाळ-संध्याकाळ अनेक जण हजेरी लावतात. यातील काही अतिउत्साही मंडळींकडून गैरप्रकार होण्याचीही शक्यता असते. परिणामी, आग लागण्यासारख्या घटनाही घडू शकतात. त्या टाळण्यासाठी वन विभागाने या ठिकाणी कायमस्वरूपी चौकीदार नियुक्त करणे आवश्यक आहे. मात्र, तशाही उपाय योजना झालेल्या नाहीत. सह्याद्री देवराई प्रकल्पाला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, याकरिता दोन वर्षांपूर्वी डोकेवाडा तलावावरून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. त्याचे टेंडरही झाले होते. परंतु, ज्या कंत्राटदाराला ते मंजूर झाले, त्याने काम करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर पाठपुरावा न झाल्याने ही मंजुरी अद्याप कागदावरच आहे.हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


