‘समृद्धी महामार्गामुळं विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील’

समृद्धी महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महामार्गामुळं कमी होतील. शेतकऱ्यांना या महामार्गाचा फायदा होईल, असा दावा एमएसआरडीसीचे अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  केलाय. सध्या मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी १८ ते २० तास लागतात. समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) हे अंतर आठ तासांमध्ये गाठता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांसह समृद्धी महामार्गाची पाहणी केली. कोरोना काळात महामार्गाचे काम मार्गी लावले. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्याचं समाधान असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

महामार्गामुळं वेळ आणि इंधनाची बचत होईलच. याशिवाय हा मार्ग पर्यावरणपूरक असेल. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यावर प्रक्रिया होईल. या भागात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यावर आधारित उद्योगधंदेही येतील. या सर्व गोष्टींचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असा दावाही एकनाथ शिंदेंनी केलाय.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात होतात, त्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्या उपाययोजना आहेत? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग अपघातमुक्त असेल. यासाठी महामार्गावर विशेष प्रणाली असेल. नियमांचे पालन करुन वाहन चालवल्यास अपघात होणार नाही. मी स्वत: या महामार्गावर गाडी चालवलीये. हा चांगला अनुभव होता. १२० च्या पुढं गाडी चालवली तरी काही अडथळे आले नाहीत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply