
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामातील पिकांसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यातील ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. विमा काढण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या चोवीस तासांत विक्रमी ५ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण आकडा ८४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाचे राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांनी आपला विमा हप्ता भरून पीकविमा घेतला आहे. विभागनिहाय आकडेवारी पाहता औरंगाबाद विभाग आघाडीवर असून, सर्वाधिक २३ लाख ८३ हजार ९०४ शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे. त्या खालोखाल लातूर विभागात २९ लाख १३ हजार ३९ शेतकऱ्यांनी, पुणे विभागातील २४ लाख २३२ शेतकऱ्यांनी, नाशिक विभागातील २२ लाख १ हजार ८४८ शेतकऱ्यांनी, नागपूर विभागातील २० लाख ४८९ शेतकऱ्यांनी, अमरावती विभागात १० लाख ३१ हजार ३९३ शेतकऱ्यांनी आणि सर्वात कमी कोकण विभागातील ५९ हजार ९३७ शेतकऱ्यांनी आपला हप्ता भरून विमा काढला आहे.
४१ लाख ५४ हजार १६६ हेक्टर क्षेत्र संरक्षित
अर्ज केलेल्या ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या २९ लाख २३ हजार ३८२ असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ६७ लाख ७१ हजार ३७ इतकी आहे. या शेतकऱ्यांनी ४१ लाख ५४ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा घेऊन संरक्षित केले आहे. एकूण संरक्षित विमा रक्कम २०२८६.४३ कोटी रुपये इतकी असून, एकूण विमा हप्ता ३२७२.२२ कोटी रुपये इतका आहे. त्यात शेतकरी जमा हप्ता ४६४.२० कोटी रुपये, राज्य सरकारचा वाटा १४०५.०४ कोटी रुपये आणि केंद्र सरकारचा वाटा १४०२.९८ कोटी रुपये इतका आहे.
केंद्र सरकारचे पीकविमा संकेतस्थळ आणि राज्याचे महाभूमी अभिलेखचे संकेतस्थळ व्यवस्थित चालल्यामुळे शेतकरी सरकारी सुटीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतरही विमा काढू शकले. मागील २४ तासांत साडेपाच लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, इतक्या मोठय़ा क्षमतेने ऑनलाइन काम सुरू आहे.
– विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


