
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर दीड ते पावणे दोन तास शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेल्या वादावर या वेळी चर्चा झाल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या रखडलेल्या बदल्यांचा विषयावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यामधील पोलिसांच्या रखडलेल्या बदल्या, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवीमध्ये झालेला वाद आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था या विषयांवर यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असून त्यांनी प्रभावदेवी प्रकरणाबरोबरच पोलिसांच्या बदल्यांच्या विषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल अशी शक्यता या बैठकीनंतर व्यक्त केली जात आहे.
मागील दहा दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी भेट देत होते. मात्र या कालावधीमध्ये राजकीय चर्चा आणि घडामोडी मागे पडल्या होत्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक झाली. या बैठकीमधील महत्त्वाचा विषयांमध्ये मुंबई पोलिसांच्या बदल्या हा देखील होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करणं कठीण होईल. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्ग लावण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. मुंबईवर मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचं वर्चस्व आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या बदल्या करताना शिंदे गट कशाप्रकारे अधिकारी नियुक्ती करणार याकडे लक्ष लागलेलं आहे.
या बैठकीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये प्रभादेवी येथे झालेल्या वादावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांदरम्यान झालेल्या वादामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून त्याप्रकरणी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेल्या वादातून शनिवारी ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटातील शाखाप्रमुखाला मारहाण केली. या वेळी झालेल्या वादानंतर सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रकरणी विभागप्रमुख महेश सावंत व चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
शिंदे गट आणि शिवसेनेदरम्या झालेल्या वादानंतर पोलीस स्थानकामध्ये जी तक्रार करण्यात आली आहे ती संतोष तेलवणे शिंदे गटाच्या शाखा क्रमांक१९४ चे शाखाप्रमुख आहेत. त्यांनी दादर पोलीस ठाण्यात मारहाणीप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी ठाकरे गटाचे माहीम विभागप्रमुख महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, प्रथमेश बीडू, विपुल ताटकर, यशवंत विचले, विजय पांडे, चंदन साळुंखे, संजय सावंत, दुतेश रहाटे, रवी पंडय़ाचील व इतर २० ते २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. या वेळी तेलवणे यांनी त्यांच्या दोन सोनसाखळय़ा हिसकावून पलायन केल्याचा आरोप शिवसैनिकांवर केला होता. त्यामुळे अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी महेश सावंत व इतर चार पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली. पण या प्रकरणातील भादंवि कलम ३९५ कलम हटवल्यामुळे सर्व पाच शिवसैनिकांना पोलीस ठाण्यातूनच जामीन देण्यात आला आहे.
शहर
- पुण्यात संशयाचे भूत; पत्नीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, पतीने केली तरुणाची निर्घृण हत्या!
- पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर धावत्या कारमध्ये महिलेला अमानुष मारहाण
- छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारांचा थरारक पैलू; वृद्ध माऊली दीड महिना 'डिजिटल अरेस्ट', ९३ लाख ५० हजारांचा गंडा
- लग्नात 'स्कॉर्पिओ' दिली तरी 'फॉर्च्युनर'साठी छळ! सासरच्या जाचाला कंटाळून दीपिकाने १४ महिन्यांतच संपवलं आयुष्य!
महाराष्ट्र
- खाकीची असंवेदनशीलता! नागपुरात बेपत्ता मुलीच्या पालकांच्या आक्रोशासमोर पोलिसांचे अजब उत्तर; म्हणाले, "शोधायला गाडीत 'डिझेल'च नाही!"
- मुंबईत धावत्या रिक्षावर कोसळले महाकाय झाड! १४ वर्षीय आरिका श्रीवास्तवचा दुर्दैवी मृत्यू, एक जण गंभीर!
- नागपूर: १२ वर्षांचा संसार, पदरात २ लेकरं! पत्नीने मुलांची जबाबदारी नाकारत घर सोडल्याने नागपुरात ३४ वर्षीय पतीची आत्महत्या!
- लातूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना; बोधे नगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू
गुन्हा
- उत्तर प्रदेश हादरले! घरात एकट्या असलेल्या विवाहितेचे हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबून निर्घृण हत्या!
- पुण्यात संशयाचे भूत; पत्नीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, पतीने केली तरुणाची निर्घृण हत्या!
- इंजिनिअर भावंडांची 'बनावट' माया! गडचिरोलीत नकली नोटांची फॅक्टरी उद्ध्वस्त; नागपूर कनेक्शन उघड, ४ जण अटकेत!
- छत्तीसगड हादरले! दारुड्या पतीने केली गर्भवती पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; पोटातील बाळही दगावले!
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- 'जेलर २' च्या सेटवर काळाचा घाला! २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; रजनीकांतच्या चित्रपटाच्या शुटिंगला गालबोट.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.


























Subscribe to my channel




