
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ८०-९० जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव असून, त्यांनी मनसेशी युती करून त्यांना आपल्या वाटय़ातील जागा द्याव्यात, असा भाजपचा विचार आहे. न्यायालयीन लढाईत चित्र स्पष्ट झाल्यानंतर योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
भाजप नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत. मात्र, मनसेशी थेट युती करण्याची भाजपची तयारी नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ नये आणि शिवसेनेची मराठी मतपेढी फोडण्यासाठी मनसेचा वापर करावा, अशी भाजपची रणनीती आहे.
भाजपने शिंदे गटाबरोबर युती करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळते का आणि शिवसेनेतील किती नगरसेवक शिंदे गटाकडे येणार, यावर किती जागा सोडायच्या, याविषयी निर्णय होईल. मनसेशी वेगळी युती करून त्यांना जागा सोडणे भाजपला शक्य नसल्याने छुप्या सहकार्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाशी युती म्हणून त्यांना ८०-९० जागा सोडायच्या आणि प्रभागांमधील ताकदीनुसार शिंदे गटाने त्यामधून मनसेच्या उमेदवारांसाठी जागा सोडायच्या, असे तूर्त ठरविण्यात आले आहे. मनसेकडे अनेक जागांवर चांगले उमेदवार नसले तरी शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप त्यांचा वापर करण्याचे संकेत आहेत. मनसे जिथे निवडून येऊ शकते, त्या जागांवर भाजप उमेदवार देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्याचे समजते. काँग्रेस, समाजवादी व अन्य पक्ष, मुस्लिमबहुल विभाग अशा सुमारे ४० जागांवर भाजप निवडून येऊ शकत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपने १९४ जागा लढवून ८२ जागांवर विजय मिळविला होता. आता शिंदे गट व मनसेसाठी जागा सोडाव्या लागणार असल्याने भाजपला जिंकून येण्याचा टक्का (स्ट्राईक रेट) वाढवावा लागणार आहे, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले. राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठापुढे २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाकडे राहणार, याबाबत निर्णय घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगास देण्यात आली तर ऑक्टोबरमध्ये निर्णय होऊ शकतो. मात्र, ती न मिळाल्यास निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह मिळू शकते. तसे झाल्यास रणनीती बदलली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचनेविषयीची याचिका प्रलंबित असून, त्यावर निर्णय झाल्यावरच निवडणूक कधी होणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच रणनीती व जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे संबंधितांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप हे युतीत निवडणुका लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सध्या जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल, असे मुंबई भाजपचे प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी अनेकदा संपर्काचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय युती किंवा सहकार्य कोणाशी करायचे, कसे करायचे, याबाबत सर्व निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील.
-संदीप देशपांडे, माजी नगरसेवक, मनसे
मनसेशी युतीची कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबरही जागावाटप झालेले नाही.
-आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष
शिवसेना-शिंदे गट संघर्ष रस्त्यावर
मुंबई : अनंत चतुर्दशीला प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर संघर्षांची पहिली ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी शिवसेना आक्रमक झाली. शिंदे गटाला आक्रमक उत्तर देणाऱ्या शिवसैनिकांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिक हेच ब्रह्मास्त्र असल्याच्या शब्दांत त्यांची पाठ थोपटत आक्रमक भूमिकेचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याने शिवसेना-शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला असून, दसरा मेळावा कोणाचा यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. अशा तणावाच्या वातावरणात अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाच्या वेळी प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाने शेजारी-शेजारी व्यासपीठ उभारले होते. त्यावेळी राजकीय टोलेबाजीतून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. शिवसैनिकांनी शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याप्रकरणी सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला. शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत व चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर तिकडे आले व त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातून दोन्ही गटांतील वातावरण पेटले होते. शिवसैनिकांना अटक झाल्याचे कळताच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. शिवसेना-शिंदे गटातील कार्यकर्त्यांमधील भांडणावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यांच्यावर कारवाईसाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. एकतर्फी कारवाई चालणार नाही. सत्तेचा गैरवापर करून शिवसैनिकांवर कारवाई झाली आहे. शिवसैनिक दादागिरी सहन करत नाहीत व करणारही नाहीत, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. शिवसेना कार्यकर्त्यांवर चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला असून तो काढून घेण्याची व गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग खरी शिवसेना काय आहे, हे ज्यांना कुणाला पाहायचे आहे त्यांना कळेल, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला. ठाकरे सरकारने गुंडांचा बंदोबस्त केला होता. त्यांच्या कारकीर्दीत असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत झाली नाही. आता सत्ताधारी आमदारच अशी कृत्ये करत आहेत, असे सावंत म्हणाले. अखेर शिवसैनिकांवरील चोरीचा आरोप हटवण्यात आला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली.
जामिनावर सुटका झालेल्या शिवसैनिकांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे समर्थन केले. त्यामुळे आता मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षांचा भडका रस्त्यावर उडण्याची चिन्हे आहेत.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




