विमान अपघातावर सर्वच शंका व्यक्त करताय! आदित्य ठाकरेंचं वक्तव्य

आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच घडलेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे. या घटनेवर अनेकांकडून शंका व्यक्त होत असून, उपमुख्यमंत्री सुनैत्रा पवार यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. या प्रकरणातील ब्लॅक बॉक्ससारख्या मुद्द्यांवरून संशय वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अल्पसंख्याक विभागातील शाळांना मंजुरी देण्यासाठी लाखोंची लाच मागितल्याचे आणि दीड ते दोन हजार शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचे आरोप त्यांनी केले. या सरकारमधील अधिकारी भ्रष्ट असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील सुशोभीकरण प्रकल्पावर ७५० कोटी रुपये खर्च होऊनही कोणतेही ठोस काम दिसत नसल्याचे आणि ९९% निधी सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडे गेल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसारखे महत्त्वाचे प्रकल्पही अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *