राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत दाखल; राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली भेट, नेमकं कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. दौऱ्यादरम्यान डोवाल यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानावर भेट घेतली. डोवाल आणि मुख्यमंत्र्यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. डोवाल यांनी सकाळीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. जवळपास अर्धा तास विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ स्प्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्तपूर्वी सुरक्षाविषयक आढावा घेण्यासाठी डोवाल मुंबईत दाखल झाले आहेत.

राज्यपाल कार्यालयाकडून डोवाल आणि कोश्यारींच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. राज्यपाल कोश्यारी आणि डोवाल यांची सदिच्छा भेट झाली असं म्हणत हा फोटो ट्वीट केला आहे.

अजित डोवाल पोलीस महासंचालक रजनीश शेठ तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. त्यांच्याकडून सुरक्षाविषयक आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत घातपात घडविण्याच्या धमक्या आल्या होत्या. तसेच दोन आठवड्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोटही आढळून आली होती. याच अनुषंगाने डोवाल हे पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून सुरक्षाविषयक आढावा घेणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply