राज्यसभेत भाजप आघाडीची ताकद कायम!

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने २० जागा जिंकल्या असत्या. पण, २२ जागा मिळाल्या आहेत.

राज्यसभेसाठी १५ राज्यांमध्ये ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४१ जागांसाठी उमेदवार बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्र (६), हरियाणा (२), कर्नाटक (४) आणि राजस्थान (४) या राज्यांतील १६ जागांसाठी अटीतटीची लढाई झाली. कर्नाटकमध्ये भाजपने ३, काँग्रेसने १ जागा, महाराष्ट्रातून भाजपने ३, काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १ जागा जिंकली. राजस्थानमध्ये काँग्रेसने ३ तर भाजपने एका जागेवर विजय मिळवला. हरियाणामध्ये भाजप व अपक्ष विजयी झाले व काँग्रेसचे अजय माकन यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. बिनविरोध ४१ जागांमध्ये उत्तर प्रदेशातून (११) सर्वाधिक ८ जागा भाजपने जिंकल्या. सपने १, सप-राष्ट्रीय लोकदल यांचा संयुक्त उमेदवार जयंत चौधरी आणि सपच्या पाठिंब्यावरील अपक्ष कपिल सिबल विजयी झाले. बिहारमध्ये (५) भाजप व राष्ट्रीय जनता दलाने प्रत्येक २ व जनता दलाने (सं) १ जागा जिंकली. झारखंडमध्ये (२) भाजप व झारखंड मुक्ती मोर्चाचा प्रत्येकी १ उमेदवार निवडून आला. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले. ओडिशामध्ये बिजू जनता दलाने तीनही जागा राखल्या. तेलंगणामध्ये दोन जागा राष्ट्रीय तेलंगण समितीने जिंकल्या. तमिळनाडूमध्ये (६) सत्ताधारी द्रमुकला ३ जागा, काँग्रेसला १ आणि अण्णा द्रमुकचे दोन उमेदवार विजयी झाले. आंध्र प्रदेशमध्ये चारही जागा ‘वायएसआर काँग्रेस’ने जिंकल्या तर, मध्य प्रदेशमध्ये (३) २ जागा भाजपला तर १ काँग्रेसला मिळाली. पंजाबमधील दोन्ही जागा आपने जिंकल्या तर, उत्तरराखंडमधील एका जागेवर भाजप विजयी झाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply