नाशिक : रशियाच्या हल्ल्यात युक्रेन एकीकडे बेचिराख होत असताना, जगामध्ये जनुक सुधारित नसलेल्या (नॉन जीएम) वाणाच्या मक्याच्या निर्यातीचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे आता स्वाभाविकपणे जागतिक बाजारपेठेची सारी नजर जनुक सुधारित नसलेल्या भारतीय मक्यावर केंद्रित झाली आहे. बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशियामध्ये मक्याची निर्यात सध्या जोरात सुरू आहे. परिणामी, मक्याच्या निर्यातीचा भाव क्विंटलला २०० ते २५० डॉलरवरून ३४५ डॉलरपर्यंत पोचला आहे.
युक्रेनचा जागतिक बाजारपेठेतील मक्याचा हिस्सा १७ टक्क्यांपर्यंत आहे. युक्रेन हा नॉन जीएम मक्याचा उत्पादक आणि निर्यातदार आहे. याखेरीज जागतिक बाजारपेठेमध्ये युक्रेनच्या मक्याचा सर्वांत कमी भाव असतो. त्यामुळे युक्रेनच्या भावामध्ये भारतीय मक्याची निर्यात होते. युद्धाचा भडका उडण्याअगोदर मक्याचा जागतिक बाजारपेठेतील भाव टनाला २१ हजार रुपयांपर्यंत होता. आता हाच भाव टनाला २६ हजार रुपयांपर्यंत झेपावला आहे. भारतीय मक्याचे भाव वाढले असले, तरीही आयातदारांकडून मक्याची मागणी कायम आहे. याखेरीज पशुखाद्य वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली आहे.
कोंबड्यांच्या खाद्याचे भाव २५ टक्क्यांनी वाढले
कुक्कुटपालन उद्योगामधील खाद्यात मक्याचा उपयोग ६५ टक्के केला जातो. युक्रेन-रशिया युद्धामुळे खाद्यासाठीच्या मक्याचा भाव २५ टक्क्यांनी वाढला आहे. कोंबड्यांच्या खाद्यासाठी दोन हजार रुपये क्विंटल भावाने मका विकत मिळायचा. आता त्यास दोन हजार ४०० रुपये द्यावे लागतात. त्याच वेळी खाद्यात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा भाव किलोला ११५ वरून १३३ रुपयांपर्यंत पोचला आहे. याशिवाय महिन्यापूर्वी सोयामिलचा टनाचा भाव ५५ हजार रुपये होता. तो आता ६५ हजार रुपयांपर्यंत पोचला आहे.
परिणामी, कुक्कुटपालन उद्योगासाठीच्या खाद्याच्या भावात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, उद्योगांमधून मिळालेल्या माहितीनुसार देशातून जानेवारी २०२२ मध्ये पाच लाख टन, तर गेल्या महिन्यात साडेतीन लाख टन मक्याची निर्यात झाली. युक्रेन-रशिया युद्धाअगोदर मका स्वस्त असल्याने निर्यात वाढली होती. आता मागणीएवढा मका मिळत नसल्याने भारतीय मका भाव खाऊ लागला आहे.
'कोंबड्यांचे खाद्य आणि चिकनच्या भावाचा उच्चांक झाला आहे. मका, सोयामिल आणि खाद्यासाठीच्या तेलाच्या किमती वाढल्याने ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. यापूर्वी ८५ रुपये किलो भावाने ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन व्हायचे. आता हा खर्च १०५ रुपये असा झाला आहे. कोंबड्यांची किंमत वाढल्याने १८० ते २०० रुपये किलो भावाने मिळणारे चिकन आता ग्राहकांना २५० ते ३०० रुपये किलो भावाने विकत घ्यावे लागते.''
-उद्धव आहेर (आनंद ॲग्रो समूह)हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




