नाशिक : महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकचा कालावधी १४ मार्चला संपुष्टात आला असला तरी अनेक नगरसेवकांकडून उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. परंतु, आता यापुढे उद्घाटन कार्यक्रमाला जाताना किंवा पत्रिकांवर नावे प्रसिद्ध करताना माजी लावावे लागणार आहे. विद्यमान नगरसेवक म्हणून मिरवल्यास गैरवापर केल्यावरून गुन्हे दाखल होण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी दिली. त्याचबरोबर आता लेटरहेडसह महापालिकेचे बोधचिन्ह वापरता येणार नाही. वाहनांवरील बोधचिन्हदेखील हटवावे लागणार असल्याने या नियमांचे किती पालन होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
१४ मार्च २०१७ रोजी नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकला पहिल्या महासभेपासून प्रारंभ झाला होता. रंजना भानसी यांची महापौर म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतरच्या दुसऱ्या अडीच वर्षासाठी सतीश कुलकर्णी महापौर राहिले. सहाव्या पंचवार्षिकची मुदत १३ मार्चला रात्री संपुष्टात आल्यानंतर १४ मार्चपासून प्रशासनाने सूत्रे हाती घेताना महापौर, उपमहापौरांच्या वाहनासह विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, प्रभाग समिती सभापतींची वाहने ताब्यात घेतली. त्याचबरोबर कार्यालयांनादेखील टाळे ठोकण्यात आले.
नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला तरी अनेक ठिकाणी विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. वास्तविक निवडणुकीच्या तोंडावर कामे दाखविण्यासाठी नगरसेवकांची धडपड होती. उद्घाटने करताना नगरसेवकांकडून कामाचे श्रेय घेतले जात होते. मुदत संपुष्टात आल्यानंतरही कामांची उद्घाटने सुरू आहे. परंतु, त्या कार्यक्रमांमध्ये विद्यमान म्हणून मिरविले जात आहे. त्यामुळे आता विद्यमान म्हणून नगरसेवकांना मिरविता येणार नाही. नियमाप्रमाणे त्यांच्यावर ‘माजी’ असा शिक्का बसला आहे.
दुरुपयोग झाल्यास गुन्हा
विकासकामासह अन्य कामासाठी नगरसेवकांना लेटरहेड, तसेच बोधचिन्ह वापरण्याची परवानगी कार्यकाळात दिली जाते. कार्यकाळ संपुष्टात आल्याने माजी झालेल्या नगरसेवकांना लेटरहेड व महापालिकेच्या बोधचिन्हाचा वापर करता येणार नाही. लेटरहेडचा वापर करताना नावापूर्वी ‘माजी’ लावावे लागणार आहे. वाहनांवरील बोधचिन्हदेखील हटवावे लागणार आहे. बोधचिन्हासह लेटरहेडचा दुरुपयोग झाल्यास गुन्हे दाखल होवू शकतात, असे प्रशासनातील सूत्रांनी दिल्या.हे पण वाचा-
शहर
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
महाराष्ट्र
- अमरावतीत औद्योगिक प्रदूषणाचा मोठा स्फोट! नांदगावपेठच्या जमिनीत सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड घातक पातळीवर; निरी (NEERI) च्या अहवालानंतर भूसंपादनाचे आदेश!
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य

























Subscribe to my channel




