संपूर्ण जगाची झोप उडवणारी बातमी आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे अनेक देशांवरील कर 10 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक कर 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. हे पाऊल कायदेशीरदृष्ट्या योग्य असून अमेरिकन हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असल्याचे वर्णन करत त्यांनी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील देशांना आता मोठा फटका बसणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत ही घोषणा केली आहे. त्यांनी माहिती दिली की हा नवीन कर तात्काळ लागू होणार आहे. त्यांनी हे पाऊल अमेरिकेचा फायदा घेणाऱ्या देशांच्या अन्याय्य व्यापार पद्धतींना प्रतिसाद म्हणून उचलले असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकन सरकार पुढील काही महिन्यांत नवीन, कायदेशीररित्या वैध असलेले टॅरिफ लादणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अनेक देशांनी अनेक दशकांपासून अमेरिकेचा फायदा घेतला आहे, त्यांच्यावरील कर वाढवणे गरजेचे आहे असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.
US President Donald Trump posts – “…I, as President of the United States of America, will be, effective immediately, raising the 10% Worldwide Tariff on Countries, many of which have been “ripping” the U.S. off for decades, without retribution (until I came along!), to the… pic.twitter.com/kFZQJiJNnq
— ANI (@ANI) February 21, 2026
जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर भारतासह जगभरातील देशांना मोठा फटका बसणार आहे. कारण याचा जागतिक व्यापारावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. अमेरिकेशी मोठ्या प्रमाणात व्यापार करणाऱ्या देशांच्या निर्यातीवर दबाव येऊ शकतो. त्याच बरोबर अमेरिकेच्या या शुल्काला प्रत्युत्तर म्हणून इतर देश अमेरिकेवर टॅरिफ लादू शकतात. यामुळे पुन्हा एकदा जागतिक व्यापार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा दणका
दरम्यान, याआधी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देत, ट्रम्प प्रशासनाने लादलेले मोठे शुल्क बेकायदेशीर ठरवत ते रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की, 1977 च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा वापर करून गेल्या वर्षी मोठे जागतिक शुल्क लादून राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकारांचा अतिरेक केला होता. मात्र असे टॅरिफ वाढवते त्यांच्या अधिकारात येत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं.
शहर
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
- आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
- दूध उत्पादकांना दिलासा; कात्रजकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ!
- पुणे: धरणसाखळीत १७ TMC पाणी, तरीही पाणीकपात का? सजग नागरिक मंचाचा मनपाला थेट सवाल
महाराष्ट्र
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात


























Subscribe to my channel


