मुंबई : शिंदे - ठाकरे गट राड्या प्रकरणी 'या' कार्यकर्त्यांसह चाळीस जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : ठाण्यातील किसन नगर भागात शिंदे ठाकरे गटात झालेल्या मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दाेन्ही गटातील प्रमुख नेत्यांसह सुमारे चाळीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

 
या राड्या प्रकरणी पाेलिसांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्यासह दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर तसेच ठाकरे गटाचे दीपक साळवींसह तीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शिंदे गटाकडून धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे, गळ्यातील साखळी हिसकावणे, मुखमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणे, बदनामीकारक घोषणा देऊन जनमानसात बदनामी होईल असे कृत्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली हाेती.
 
उद्धव ठाकरे गटाचे दिपक साळवी यांनी दिलेल्या तक्रारीनूसार मारहाण करणे, साखळी हिसकाविणे या तक्रारीनूसार पाेलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply