मुंबई : विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई; पक्षाकडून नोटीस

मुंबई: शिंदे-भाजप सरकारच्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. आमदारांच्या या हलगर्जीपणाची काँग्रेस हायकमांडने गंबीर दखल घेतली आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या आमदारांबाबातची तक्रार काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेत आता काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी ९ आमदारांना शिस्त पालन कमिटी नोटीस बजावणार आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा अवहाल काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे.

दरम्यान, आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोले यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीत हायकमांड चुकीच्या आमदारांवर कारवाई करण्याबाबत गंभीर आहे. ज्यांनी क्रॉस व्होट केले आणि जे फ्लोअर टेस्टला गैरहजर राहिले अशा आमदारांवर कारवाई करावी याबाबतचा अहवाल सादर केला असून या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. मात्र, कारवाईचे स्वरूप काय असेल हे काँग्रेस हायकमांड आणि शिस्तपालन समिती ठरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण -

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची काही मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. यानंतर भाजपच्या उमेदवारांनी १० पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी-शिवसेनेचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी झाले होते तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला होता. दरम्यान, शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळीही काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. आपल्याला सभागृहात येण्यास उशीर झाला असल्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply