मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळ नदीपात्रात भोगावती सापडली स्फोटके

मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळ भोगावती नदीपात्रात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात भितीचे वातावरण आहे. स्फोटके निकामी करण्यासाठी अलिबाग आणि नवी मुंबई येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

आज (गुरुवार) संध्याकाळी भोगावती नदी पात्रात महामार्गावरील पुलाखाली ही स्फोटके आढळून आली आहेत. डिटोनेटर आणि जिलेटीनच्या कांड्यांचा यात समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या स्फोटकांना टायमर लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे परिसरात भितीचे वातावरण आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नवी मुंबई आणि अलिबाग मधील बॉम्ब शोधक पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. नदी पात्रातून स्फोटक सुरक्षितपणे बाहेर काढून निकामी करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. स्फोटके नदी पात्रात कशी आणि कुठून आली याचा तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. तसेच आसपासच्या परीसराला प्रशासनाने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply