मुंबई: आम्ही आंदोलन मागे घेतोय, कारण…; रवी राणांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि भोंगा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम होते. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रभर शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर बसून होते.

नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आल्यास त्यांना धडा शिकवणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. आता रवी राणा यांनी आपण आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे राणांनी सांगितले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्याने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं रवी राणा यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना रवी राणा म्हणाले की मातोश्री आमच्या हृदयात आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या मनात आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी चालिसा न वाचणं हे या सरकारचं पाप आहे याला आता लोकचं उत्तर देतील. आमचा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी कायम राहणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे. मला आणि नवनीत राणांना विरोध करणं हे योग्य नाही. आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलं घरात डांबून ठेवण्यात आले. आमच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र होते. पश्चिम बंगालसारखी महाराष्ट्रात परिस्थिती होत आहे. श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील, मुख्यमंत्र्यांना प्रचंड अहंकार, तो त्यांच्या डोक्यात गेल्यामुळे हे घडतंय असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत. शिवसैनिकांनी आमच्या घरासमोर आले त्यांनी दगडफेक केली यामागे सर्व मुख्यमंत्र्यांचे आदेश होते असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी मला आता परवानगी द्यावी मी मातोश्रीवरती जाऊन हनुमान चालीसाचे पठन करेल असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. राणा दाम्पत्यांच्या मुंबईतील घराबाहेर आणि अमरावती घराबाहेर प्रचंड शिवसैनिकांचा गराडा आहे त्यामुळे राणा दाम्पत्य दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply