मुंबईत 50 लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक; उर्वरित साथीदारांचा शोध सुरू

मुंबई - शहरात अमली पदार्थाची तस्करी आणि सेवनाचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यातच आता मुंबईतील MHB पोलिसांनी बोरिवली परिसरातून एका गर्भवती महिलेला 50 लाख 75 हजार किंमतीच्या हेरॉईनसह रंगेहात अटक केली आहे. मुस्कान दीपक कनोजिया असे आरोपी महिलेचे नाव असून ती २३ वर्षांची आहे. एमएचबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले की, बोरिवली पश्चिमेकडील सेंट फ्रान्सिस शाळेजवळ एक महिला ड्रग्ज पुरवण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचून महिलेला अटक केली. महिलेला अटक करून चौकशी केली असता, पोलिसांनी तिच्याकडून 345 ग्रॅम, 50 लाख 75 हजारांचे हेरॉईन जप्त केले. MHB पोलीसांनी महिलेला अटक केली असून तिच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *