मालेगाव : शहरातील उर्दू प्राथमिक शाळा तपासणी दरम्यान झालेल्या शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली. शिक्षण उपसंचालकांनी या घटनेची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एफ. डब्ल्यु. चव्हाण यांनी शाळेला भेट देत चौकशी सुरु केली आहे.
शहरातील अब्बासनगर उर्दू शाळा क्रमांक ५ मधील शिक्षक हमीद महेवी यांचा रविवारी आकस्मिक मृत्यू झाला होता. महापालिका प्रशासनाने कॉंग्रेस नगरसेवकांच्या तक्रारीवरुन शाळा तपासणी सुरु केली. काही शाळेत शिक्षक नव्हते. अनेक शाळेत भाडोत्री शिक्षक आहेत. या तपासणी दरम्यानच श्री. महेवी यांचा मृत्यू झाल्याने त्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले. यानंतर शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले. श्री. चव्हाण यांनी शाळेला भेट देत शिक्षकांशी चर्चा करुन घटनाक्रम जाणून घेतला. यातच शाळांना भेट देऊन पहाणी करण्याचा नगरसेवकांना अधिकार आहे किंवा काय याची माहिती आयुक्तांनी घ्यावी, अशी मागणी नगरसेवक मुश्तकीम डिग्निटी यांनी केली आहे.
दरम्यान आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनीही बुधवारी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. मौलाना मुफ्ती यांनी शिक्षकाच्या मृत्यु प्रकरणाची सखोल चौकशी करावी. शाळेतच मृत्यू झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेतील सत्तारुढ नगरसेवक शिक्षकांना हेतुपुरस्कर लक्ष्य करीत आहेत. त्यातूनच शाळा तपासणी सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. मयत शिक्षक हमीद महेवी यांच्या कुटुंबियांची मात्र कुठलीही तक्रार नाही. तथापि, या मृत्यु प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटत आहेत.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

