बुलढाणा : फेसबुकवर मैत्री पडली महागात; वाढदिवस गिफ्टच्‍या नावाने फसवणूक

बुलढाणा : बुलढाण्यातील महिलेला फेसबुकवर अनोळखी व्‍यक्‍तीशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्‍यक्‍तीशी चॅटींग करत असताना सदर महिलेची १३ लाख ३२ हजार रूपयात फसवणूक झाली आहे. 

फेसबुकवर अनोळखी व्‍यक्‍तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ही रिक्‍वेस्‍टला प्रतिसाद देवून मैत्री केली. फेसबुकवर मैत्रीत रूपांतरित केले आणि अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करत १३ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या मैत्री वाढदिवसानिमित्‍ताने महिलेला गिफ्ट पाठविले असल्‍याचे महिलेला सांगितले.

तुमच्या वाढदिवसाला गिफ्ट पाठवले असून ते अडकलेले आहे. सदर गिफ्ट सोडविण्यासाठी वेगवेगळ्या तारखेला ऑनलाइन रक्कम फिर्यादी महिलेकडून सांगितलेल्या बँक खात्यात टाकण्याचे सांगितले. अशा प्रकारे जवळपास तेरा लाख बत्तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने बुलढाण्यातील सायबर पोलीसात तक्रार दिली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *