मुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

मुंबई: भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आज साजरी होत आहे. कोरोनाच्या संकटानंतर आज 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात सर्वत्र जयंती साजरी होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. आज दादर येथील चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांनंतर राज्यपाल, अनेक मंत्री आणि नेते मंडळी देखील या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. सोबतच राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी पालिकेच्या वतीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच आज पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



शहर

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *