आजच्या डिजीटल युगात पॅन कार्ड (Permanent Account Number) हे केवळ आयकर भरण्यासाठीच नाही, तर बँक खाते उघडणे, दागिने खरेदी करणे, वाहन खरेदी करण्यापासून इतर कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी अनिवार्य झाले आहे. अनेकदा नागरिक हे कार्ड काढण्यासाठी एजंटकडे जातात. त्यावेळी तो एजंट त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतो. पण आता सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारने ही प्रक्रिया आता अत्यंत सोपी केली आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून अवघ्या काही मिनिटांत अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents):
ओळख आणि पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड (सर्वात सोपा पर्याय कारण यात नाव, पत्ता आणि जन्मतारीख तिन्ही असते).
जन्मतारीख पुरावा: जन्म दाखला, १० वीचे प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड
फोटो आणि स्वाक्षरी: पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पांढऱ्या कागदावर केलेली स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
पॅन कार्डसाठी कसे अप्लाय कराल?
१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
सर्वप्रथम Protean (आधीची NSDL) च्या अधिकृत वेबसाइटवर जा. तिथे ‘Tax Modernization’ विभागात जाऊन ‘PAN’ पर्याय निवडा. तुम्ही थेट ‘Online PAN Application’ पोर्टलवर देखील जाऊ शकता.
२. अर्ज प्रकार निवडा
जर तुम्ही पहिल्यांदाच पॅन कार्ड काढत असाल, तर ‘New PAN – Indian Citizen (Form 49A)’ हा पर्याय निवडा.
परदेशी नागरिकांसाठी ‘Form 49AA’ हा पर्याय असतो.
यामध्ये ‘Individual’ (वैयक्तिक) हा पर्याय निवडा.
३. वैयक्तिक माहिती भरा
तुमचे आडनाव, नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा. ही माहिती तुमच्या आधार कार्डवरील माहितीशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक Token Number मिळेल, जो भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा.
४. कागदपत्रे कसे सबमिट कराल?
e-KYC (Paperless): यात आधार कार्डवरील माहितीनुसार सर्व प्रक्रिया होते, कोणत्याही प्रत्यक्ष स्वाक्षरीची गरज नसते.
e-Sign (Scanned Images): यात तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी लागते.
Physical Documents: यात तुम्हाला कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी या पोस्टाने पाठवाव्या लागतात.
५. फी किंवा शुल्क भरा (Payment)
यानंतर तुम्हाला पॅन कार्डचे शुल्क साधारण १०७ रुपये आहे. जर तुम्हाला प्रत्यक्ष कार्ड हवे असेल तर हे शुल्क तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरू शकता.
६. आधार ऑथेन्टिकेशन (Aadhaar Authentication)
शेवटी, तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो प्रविष्ट केल्यावर तुमचा अर्ज ई-व्हेरिफाय (e-Verify) होईल.
अर्ज केल्यानंतर काय होते?
तुम्ही तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला १५ अंकी Acknowledgment Number मिळेल. याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती (Status) ट्रॅक करू शकता. साधारण १० ते १५ दिवसांत पॅन कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे येते. तसेच, अर्जाच्या काही दिवसांतच तुमच्या ईमेलवर डिजीटल e-PAN देखील पाठवले जाते.
[embedded content]
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




