पुण्यातील शेवटच्या कोरोना रूग्णाला ‘नायडू’ मधून डिस्चार्ज

पुणे : राज्यात दोन वर्षापूर्वी कोरोनाचा पहिला रूग्णाची नोंद झालेल्या पुण्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, पुण्यातील महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या शेवटच्या कोरोना रूग्णाला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरातील सरकारी रूग्णालयात एकही कोरोना रूग्ण भरती नाहीये, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे 98 सक्रीय रूग्ण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात सध्या 8 स्वॅब सेंटर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

वावरे म्हणाले की, पुणे शहरातील नायडू रूग्णालयात उपचार घेणाऱ्या शेवटच्या कोरोना रूग्ण बरा झाला असून, त्याला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरातील एकाही सरकारी रूग्णालयात एकही कोरोना रूग्ण दाखल नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सध्या शहरात कोरोनाचे एकूण 98 सक्रीय रूग्णांनी नोंद असून, हे सर्व रूग्ण होम क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 18 एप्रिल 2020 लाटेत 56,650 रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, 22 जानेवारी 2022 रोजी एका दिवसात सर्वाधिक 8,600 रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, जानेवारी 2022 मध्ये एका महिन्यात सक्रीय रूग्णसंख्या 54,000 हजारांवर पोहचली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply